मुंबई : पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असल्याचे म्हटले आहे. या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कोणतीही मदत केली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केवळ प्रत्यक्ष मदत ही १ हजार ५०० कोटी रुपयांची केली असल्याचे म्हटलं आहे. राज्य सरकारने दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये अधिक निधी दिला असल्याचा खुलासा फडणवीस यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ आपत्तीग्रस्तांसाठीची मदत आणि सध्याच्या मदत पॅकेजची तुलान करुन राज्य सरकारच्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
पुनर्बांधणीचे ३०० कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे ७००० कोटी असे १० हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच दिसून येते’, असं म्हटलं आहे.
राज्य सरकारने पूरग्रस्त नागरिकांना प्रत्यक्ष मदत केवळ दीड हजार कोटींची केली असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ १५०० कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते असल्याचे ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा २०१९ मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख केल्याचे दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकर्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्यातील अधिक मालमत्तेचे नुकसानावर दीर्घकालीन योजनांसाठी आता ११ हजार ५०० कोटीचे पॅकेज राज्य सरकारने घोषित केलं आहे. यामध्ये सानुग्रह अनुदान म्हणून एसडीआरएफच्या निकषांपलिकडे म्हणजे ५ हजार रुपये निकष असताना वाढवून १० हजार रुपये करत आहोत. तसेच दुकानदारांना ५० हजार रुपये आणि टपरी धारकांना १० हजार रुपयांची मदत राज्य सरकारने घोषित केली आहे.
– पुर्णतः घर पडले असताना १ लाख ५० हजार
– ५० टक्के क्षतिग्रस्त घरांसाठी ५० हजार रुपये
– २५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी २५ हजार
– अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी १५ हजार रुपये
– टपरीधारकांना १० हजार रुपये
दुकानधारकांना ५० हजार रुपये
– ४ हजार ५०० जनावरांच्या मृत्यूची भरपाई
– ७ कोटी रुपये जनावरांच्या मृत्यूची भरपाई