Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला, चार वर्षीय मुलाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला, चार वर्षीय मुलाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/08/13 at 12:23 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये काल गुरुवारी (ता.१२) रात्री राजौरी जिल्ह्यातील खांडली परिसरात भाजप नेते जसबीर सिंग यांच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये जसबीर यांच्या चार वर्षांच्या भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला झाला तेव्हा जसबीर पूर्ण कुटुंबियांसोबत घरी होते.

१५ ऑगस्टपूर्वी जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादीच्या कारवाई वाढल्या आहेत. १५ अॉगस्टच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी संपूर्ण खोऱ्यात हायअलर्ट घोषित केला आहे. तसंच मोठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात केलीय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या हल्ल्यात एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या मुलाचां नाव वीर सिंह असल्याचं समजतंय. तो भाजप नेते जसबीर सिंह यांचा भाचा होता. याशिवाय, या हल्ल्यात आणखीन चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भाजपचे राजौरी विभाग प्रमुख नेते जसबीर सिंह आपल्या कुटुंबासोबत आपल्या घरीच निवांत बसले असताना हा हल्ला करण्यात आला. ग्रेनेडच्या सहाय्यानं घडवून आणलेल्या या हल्ल्यात जसबीर सिंह मात्र सुदैवाने वाचले आहेत.

भाजपच्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याची दहशतवाद्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वीही अनंतनागमध्ये भाजपशी निगडीत सरपंच गुलाम रसूल डार आणि त्यांची पत्नी यांची हत्या केली होती. आपल्याला दहशतवाद्यांकडून वारंवार धमक्या मिळत होत्या, मात्र सुरक्षेबाबत कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नसल्याचा आरोप कुटुंबानं केलाय.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #Grenade #attack #BJPleader #house #kills, #भाजप #नेत्याच्या #घरावर #ग्रेनेडहल्ला #चारवर्षीय #मुलाचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत रानभाजी महोत्सव
Next Article ‘तो’ येतोय; पुणे, मुंबईसह उपनगरात आज पावसाची शक्यता

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?