श्रीपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर येथे कारखान्याचे संस्थापक चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी फाउंडेशन पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराचे कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करुन आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साखर कारखान्याच्या ४०० कामगारांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.कारखान्याच्या प्रशासकीय ऑफिसमधील शेतकरी भवन येथे सकाळी ८.३० वाजता कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, रोहन परिचारक यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिरास सुरुवात झाली.
प्रारंभी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक, अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे, ऋृषीकेष परिचारक आदींनी भेट दिली. सुधाकरपंत परिचारक त्यांच्या प्रती असणाऱ्या भावना प्रत्येक रक्तदाते व मान्यवरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होत्या. कामगारांनी रक्तदान करुन आदरांजली अर्पण केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुधाकरपंत परिचारक यांचे कारखान्याच्या जडणघडणीत व पांडुरंग परिवाराच्या प्रत्येक संस्थेमध्ये असणाऱ्या योगदानामुळेच आज त्यांच्या पुण्य स्मरणनिमित्त कारखान्याच्या उत्पादन विभाग, रसायन विभाग, जनरल विभाग, अकौंट विभाग, सिव्हील विभाग, इन्स्ट्रुमेंट विभाग, ऊस विकास विभाग, सुरक्षा विभागातील कामगारांनी नाव नोंदणी करुन रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबीरासाठी रक्तपेढी म्हणून पंढरपूर येथील पंढरपूर ब्लड बँक यांनी सहकार्य केले. श्री पांडुरंग परिवारास सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शामुळे सर्व संस्था योग्य प्रकारे चालत आहेत. यासर्व संस्था अर्थीक दृष्टया सक्षम आहेत.
रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, प्रोडक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, केन मॅनेजर संतोष कुमठेकर, चीफ अकौंटंट रविंद्र काकडे, सिव्हील इंजिनियर एच.एस.नागणे, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, डिस्टीलरी मॅनेजर सय्यदनुर शेख, संगणक प्रमुख तानाजी.एस.भोसले, इस्टेट मॅनेजर रमेश गाजरे, वैद्यकिय अधिकारी डाॅ. सुधीर एस.पोफळे, प्रमोद पवार, डे.चीफ केमीस्ट, हेड टाईम किपर सोपान कदम, एम.एल.उपासे इस्ट्रुमेंट मॅनेजर, समीर सय्यद इस्ट्रुमेंट मॅनेजर,डे.चीफ इंजिनियर .ए.डी.बारटक्के,सहा.कार्यालय अधिक्षक भिमराव बाबर यांनी परिश्रम घेतले.