मुंबई : ठाण्याच्या कल्याणमध्ये एक गंभीर शस्त्रक्रिया पार पडली. 12 वर्षीय मुलीच्या पोटातून 650 ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात आला. पोटाच्या आतड्यांवर पूर्णपणे ताबा घेतलेल्या केसांचा गोळा दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं, मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून केस खाण्याची सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असं म्हणतात.
पोटाच्या आतड्यांवर पूर्णपणे केसाने ताबा घेतला होता. केसांचा गोळाला दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आला. कल्याण पूर्व भागातील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. रोहित परयानी यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच केस खाण्याची वाईट सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असं म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सोडण्यास खूप प्रयत्न केले. परंतु ती सवय काही केल्याने सुटली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या आठवड्यात तिची पोटदुखी वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस दिसून आले व गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवण जात नव्हते. पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की, हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती. त्यामुळे ओपन सर्जरीचा मार्ग निवडला गेला. अथक प्रयत्नातून केसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.
या केसाच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबीझोअर म्हणतात. या दुर्मिळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे असे गोळे तयार होतात. या केसांमुळे पोटाला ईजा होऊन पूदेखील तयार होतो. जसजसा या गोळ्याचा आकार वाढायला लागतो, तसतशी पोटदुखी सुरू होते. अनेकवेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते असे डॉक्टरांनी सांगितले.