मोहोळ : मोहोळ येथील जहीर खैरादी याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना काल मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोहोळ कुरुल रस्तावर आसरा हाँटेलजवळ असणाऱ्या दोस्ती पान दुकानाजवळ घडली. जहीर इक्बाल खरादी (वय३४ रा.बागवान नगर, मोहोळ) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जहीर खरादी हा कुरुल रोडवरील फाटे मंंगल कार्यालयाजवळ पान दुकान चालवतो. सदाम कुरेशी व नजीम कुरेशी हे जहीरचे चांगले जवळचे मित्र आहेेत. त्यांच्यासोबत तो नेेहमी फिरत होता. मंजूर कुरेशी, शहाबाद कुरेशी, गौस कुरेशी , तौफीक कुरेशी, नयुम कुरेशी ,अनिस कुरेशी , नूर कुरेशी , रिजवान कुरेशी , शोएब कुरेशी, अजिम कुरेशी, महंमद कुरेशी हे तलवार, सतुर, चाकू लोखंडी सळई, स्टंप घेवून मंगळवारी संध्ययाकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आले.
यावेळी जहीर हा त्याच्या सोमनाथ पवार या मित्रासोबत थांबला होता. आलेल्या सर्वांनी जहीरजवळ जावून तुला कीती वेळा सांगीतले तु सदाम कुरेशी व नजीम कुरेशी यांच्यासोबत फिरू नको म्हणून असे म्हणत त्यास मारण्यास सुरुवात केली. तलवार, सत्तूर, चाकू, लोखंडी सळई, स्टंपने लाथा बुक्याने मारू लागले. अनिस कुरेशी हा याला खलास करा जीव मारून टाका, असे ओरडत मारत होता. या हल्ल्यात जहीर खरादी हा गंभीर जखमी झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याचा मित्र सोमनाथ पवार याने सोडवा सोडवी केली. यात जहीरच्या दोन्ही हातावर, डाव्या डोळ्याजवळ पोटावर, पाठीवर, पायावर चाकू व तलवारीचे वार झाले आहेत. संपूर्ण शरीराला मुका मार लागला आहे. यात दिवसभर पान दुकानाची विक्रीत जमा झालेले साडेचार हजार रुपये गल्ल्यातुन काढून घेतले, दुकानातील फ्रीज व इतर सामानाची मोडतोड केली, दुकानाचीही मोडतोड केली असे फिर्यादीत म्हटले आहे. यात ११ जणांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
* रस्ता ओलांडताना रेल्वेच्या धडकेने वृद्ध ठार