श्रावणामधे येणारी ही श्रवणी पौर्णिमा फार महत्त्वाची आहे. कारण बंधु-भगिनी यांच्या प्रेमाचे प्रतिक असणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि समुद्र पूजन अशा दोन सणांनी युक्त अशी श्रावणी पौर्णिमा असते.
रक्षाबंधन :
रक्षाबंधन म्हणजे प्रेम-बंधन. आजच्या दिवशी बहिण भावाच्या हातात राखी बांधते. याचा अ पराक्रम, प्रेम व साहस यांचा संगम म्हणजे रक्षा बंधन भोग आणि स्वार्थ यांनी पछाडलेल्या जगात सर्व संबंधांमधे निस्वार्थ व पवित्र असा भावा बहिणीचा खरा प्रेमसंबंध, हा जणू खाया समुद्रामधे सापडलेल्या एखाद्या गोड्या पाण्याच्या साठ्यांसारखा आहे. भारतीय संस्कृती निस्पृहता व पवित्रता अशी महानतेची दर्शन घडवणारी श्रेष्ठ संस्कृती आहे.
रक्षाबंधन हा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण होय. बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृष्टी बदलून जाते आणि तो तिच्या रक्षाणसाठी सज्ज होतो. त्यामुळे बहिण, समाजात निर्भयपणे फिरु शकते. परंतु आजच्या समाजाकडे पाहिले असता, बहिण ही निर्भयपणे फिरु शकत नाही, तिची चेष्टा करुन पशुतुल्य वागणूक देवून आपल्या संस्कृतीची पायमल्ली होत आहे. हे समाजातील चित्रण बदलण्याची गरज आहे.
बहिण जेव्हा भावाला राखी बांधते, पण त्यापूर्वी त्याच्या कपाळाला गंध किंवा कुंकवाचा पट्टा ओढते व डोक्यावर अक्षता टाकते. तर ही भावाच्या मस्तकाची पूजा नसून भावाच्या मस्तकातील विचार बुध्दी याच्या विश्वासाचे दर्शन आहे. तसेच ह्या क्रियेत दृष्टी परिवर्तनाची प्रक्रीया सामावलेली आहे. कारण कपाळावर माणसाला तिसरा डोळा आहे. त्या डोळ्यात भाव असतात, ज्याप्रमाणे भगवान शंकराने आपला तिसरा डोका उघडून कामाला भरम करून टाकले. त्याप्रमाणे बहिण देखील गावाला तिसरा डोळा म्हणजे सुबुध्दीचा डोळा उघडून विकार, वासना याला भरम करावयाला सुचवत असते.
भावाच्या हातात रक्षा बांधून बहिण केवळ स्वतःचे रक्षण इच्छिते असे नाही तर समस्त रखी जातीला भावाचे रक्षण मिळावे अशी इच्छा करते. त्याचबरोबर बाह्य शत्रुवर व आंतरविकारावर स्वतःच्या भावाने विजय मिळवावा आणि त्यापासून सुरक्षित रहावे ही देखील भावना सामावलेली असते.
वेदामधे देव आणि दानव यांचे युध्द झाले तेव्हा देवाच्या विजयासाठी इंद्रायणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती. अभिमन्युचे रक्षण इच्छिणाऱ्या कुन्ती मातेने त्याला राखी बांधली होती. तर स्वतःच्या रक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायुनाला राखी पाठविली होती. थोडक्यात राखी मध्ये उभय पक्षाच्या रक्षणाची भावना सामावलेली आहे. रक्षा बंधनाचा सण हा भाऊ व बहिण परस्पर प्रेरक, पोषक व पूरक आहे, असा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे.
सागर पूजन :
हा सण विशेष करून व्यापारी लोकांचा समजला जातो. कारण पूर्वी समुद्रामागे व्यापार चालत असे. समुद्रावर वरुण देवताची सत्ता असते. म्हणून आपल्याला पाण्यापासून व्यापारास धोका नको म्हणून वरुण देवाची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. समुद्र पूजन म्हणजे वरुणाचे पूजन म्हणून रामद्राची पूजा करतात, ह्या दिवशी राखी पौर्णिमेदिवशी नारळी पौर्णिमा म्हणून व्यापारी लोक साजरा करतात. ह्या दिवशी इजिप्त, ग्रीस, लंका, ब्रह्मदेश,चीन, जावा इत्यादी देशात जाऊन स्वतःच्या देशाच्या संपत्ती वाढवणारे व्यापारी कलाकौशल्य, तत्वज्ञान, धर्म, देवता इत्यादीचा प्रचार करणाच्या संस्कृती वीरांची पुण्यशील व प्रेरणादायी स्मृती सागरात नारळ आणि करताना ताजी करावयाची असते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नदीपेक्षा संगम श्रेष्ठ आणि संगगापेक्षा सागर श्रेष्ठ व पवित्र आहे असे ऋषींनी सांगितले आहे. प्रत्येक नदी घाण कचरा घेवून सागराला जाऊन मिळतात. तरी पण समुद्राचे पाणी स्वच्छ असते. थोडक्यात सागराला सहनशील, क्षमाशील वृत्ती आहे. म्हणून श्रावणी पौर्णिमेदिवशी श्रीफल (नारळ) अर्पण करून पूजा करतात. पावसाचे पाणी व नद्याचे पाणी ह्यामुळे सागरात पाण्याची पातळी वाढत असते आणि पौर्णिमेला सागराला भरती येते असते. म्हणून समुद्राने रौद्ररूप धारण करू नये आणि आपल्याच पात्रात शांत रहावे यासाठी श्रीफळ अर्पण करण्याची प्रथा आहे. चंद्र ज्याच्याकडून प्रकाश घेतो, त्या सुर्याला सागर स्वतःची संपत्ती देतो आणि सूर्य देखील समुद्रातील पाण्यातील खारेपणा काढून गोड व मधुर पाऊस सर्वत्र पाडतो. ह्या प्रसंगाचे प्रतिक म्हणून समुद्रभक्त हजारो नारळ समुद्रात अर्पण करून आपली भावना व्यक्त करतात. साहजिकच श्रावणी पौर्णिमा किती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्यावे. “सागरे सर्व तीर्थानी”
– गायत्री रामकृष्ण अघोर