सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चांगलंच अंगलट आलंय. आज राज्यभरासह सोलापुरातही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून जोडे मारण्यात आले.
मुख्यमंत्र्यांविरोधात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे – संतप्त झालेल्या शिवसैनिकांच्या रोषाला आज सकाळीच सोलापूरात तोंड फुटले. “आवाज कोणाचा, शिवसेनेचा’, “कोंबडीचोर नारायण राणे हाय हाय…’च्या घोषणा देत शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांचा निषेध केला. या वेळी शिवसेना नेत्यांनी राणेंचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. गेल्या चार दिवसांपासून भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली नारायण राणे यांनी कोकणामधील सभेमध्ये शिवसेनेचे पक्षनेते, राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. नारायण राणे यांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन सुरू आहे. सोलापूर शहरात शिवसेनेच्या माध्यमातून नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून व त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण यांनी सांगितले.
सोलापुरातील कार्यकर्ते व पदाधिकारी नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे संतापलेले आहेत. सोलापुरात नारायण राणे यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करणार आहे व पोलिसांच्या माध्यमातून राणे यांना फरफटत आणणार असल्याचे सांगितले जात आहे.
नवी पेठेत प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे यांच्यासह शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतिमेस चपलाहार घातला. विद्यार्थी सेनेने लहु गायकवाड, सुरेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार्क चौकात आंदोलन केलं, येथील सार्वजनिक शौचालयावर मंत्री राणे यांची प्रतिमा चिटकावून त्यांच्या विरोधात शंखध्वनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुणे नाका चौकात पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वात असेच आंदोलन झाले. शहराच्या इतर भागातही आंदोलन झाल्याचं वृत्त आहे. सोलापूरच्या शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत जोडेमार आंदोलन आता प्रतिमेला झाला आहे ते प्रत्यक्षातही होवू शकेल असा इशारा दिला.
सोलापूर शहरात आज राणेंच्या विरोधात आंदोलन होवू शकतात या शक्यतेनं पोलीस अलर्ट होते, पण आंदोलनाच्या ठिकाणी ते वेळेवर पोहचू शकले नाहीत. दुपारी १ च्या सुमारास पार्क चौकात युवासेना आणि शिवसेना शहरवतीने राणे पिता-पुत्रांच्या प्रतिमेस जोड़ेगार आंदोलन करण्यात आलं. गुरुशांत घुत्तरगांवकर, गणेश बानकर यांच्या नेतृत्वा हे आंदोलन झालं.
* नारायण राणेंच्या बंगल्यासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने, पहा व्हिडिओ
मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज मुंबईत शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जुहू परिसरातील नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दगडफेक झाली. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यात काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. तर एका पोलिसालाही दुखापत झाली आहे.दरम्यान कोकणात नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाली असून चिपळून, कोकणात तणावाची परिस्थिती आहे.