Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रामजन्मभूमी मंदिर दोन शैलीने बांधणार; अहमदाबादचे सोमपुरा कुटुंब साकारणार राममंदिर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

रामजन्मभूमी मंदिर दोन शैलीने बांधणार; अहमदाबादचे सोमपुरा कुटुंब साकारणार राममंदिर

Surajya Digital
Last updated: 2020/08/04 at 5:35 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अयोध्या / नवी दिल्ली  : अयोध्येतील रामजन्मभूमी येथे उद्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अनेक दिग्गज व्यक्तिमत्व हजर राहणार आहेत. पण हे मंदिर दोन शैलीत बांधण्यात येणार आहे जाणून घेऊया अधिक माहिती.

भारतातील बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या राम मंदिराचं डिझाइन तयार करणं सोपं नाही. मुळात या मंदिरांच्या दोन शैली येथे बांधल्या गेल्या आहेत. एक म्हणजे द्रविड शैली, ज्याची मंदिरे दक्षिण भारतात बांधली आहेत. दुसरी म्हणजे नागर शैली. या शैलीची मंदिरं उत्तर भारतात आढळतात.

१ जुलैला रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची एक बैठक झाली. त्यात मंदिराच्या मॉडेलमध्ये थोडा बदल झाल्याची चर्चा होती. त्या बैठकीत सोमपुरा कुटुंबाशी संबंधित चंद्रकांत सोमपुरा हेच मंदिराची रचना तयार करतील, असा निर्णयही घेण्यात आला. १९८७ साली राम मंदिराचा नकाशादेखील वास्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनीच तयार केला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चंद्रकांत सोमपुरा यांनी देश आणि जगातील नागरी शैलीतील मंदिरांची रचना केलेली आहे. लंडनमधील प्रसिद्ध अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराची रचना त्यांनी केली होती. या मंदिराचे स्थापत्य आणि भव्यता कायमच चर्चेचा विषय असतो.  सोमपुरा कुटुंबाने आत्तापर्यंत सोमनाथ मंदिरासह २०० वेगवेगळी मंदिरं बांधली आहेत. पण अयोध्येमधलं राम मंदिर हे त्यातलं सगळ्यात बहुचर्चित मंदिर असणार आहे.

सी. बी. सोमपुरा, टेम्पल आर्किटेक्ट’ ही सोमपुरा यांची कंपनी राम मंदिर उभारणीच्या प्रकल्पात पहिल्यापासून सहभागी आहे. अहमदाबादच्या गजबजलेल्या भागात सोमपुरांचं कार्यालय आहे. तिथे काही माणसं संगणकावर त्रिमिती (3D) डिझाइनवर काम करताना दिसतात. भव्य अशा राम मंदिराचे डिझाइन करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने १८ जुलै रोजी मान्यता दिली आहे. आशीष हा सोमपुरा यांचा ४९ वर्षांचा मुलगा आताचा राम मंदिराचा प्रकल्प हाताळतो आहे. तो १८ जुलै रोजीच्या ट्रस्टच्या बैठकीला उपस्थित होता.

* डिझाईनर सोमपुरा कुटुंबाविषयी माहिती

गुजरातचे सोमपुरा कुटुंब हे नागर शैलीतील मंदिरांचे शिल्पकार मानले जातात. हे संपूर्ण कुटुंब नागर शैलीची मंदिरे बनविण्यात पारंगत आहे. चंद्रकांत सोमपुरा यांचे वडील प्रभाशंकर सोमपुरा यांनी गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराची रचना केली. त्यांनी मथुराच्या मंदिराचीदेखील संरचना केली होती.  नागर शैलीची मंदिरे बांधण्याची कला प्रभाकर सोमपुरा यांनी आपल्या कुटुंबीयांना शिकवली. त्यामुळे नागर शैलीतील मंदिरात रचनेत त्यांच्या कुटुंबातील जवळजवळ सारेच निष्णात आहेत. सोमपुरा कुटुंबातील सदस्य केवळ देशातच नाही तर परदेशातही विविध ठिकाणी हिंदू मंदिरांच्या रचना करत आहेत.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #राममंदिर #दोनशैलीत #बांधणार #अहमदाबाद #सोमपुराकुटुंब
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शीचा अजिंक्य विद्यागर यूपीएससीमध्ये यशस्वी; तिस-या प्रयत्नात मिळाले यश
Next Article सोलापूर शहरात 126 रूग्णांची कोरोनावर मात, आज एकही मृत्यू नाही मात्र 44 रूग्णांची वाढ

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?