सोलापूर : सोलापूर शहरात आज मंगळवारी आलेल्या कोरोना अहवालात 44 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने आजच्या अहवालात एकही मृत्यू नाही. मात्र 44 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. दिलासादायक म्हणजे कोरोनावर तब्बल 126 जणांनी मात केली आहे. त्यामध्ये 61 पुरूष आणि 65 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 190 झाली असून यामध्ये पुरुष 3 हजार 28 तर महिला 2 हजार 162 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील मृत्यू दर कमी झाला आहे. आज एका रुग्णांचा मृत्यू नाही. आतापर्यंत शहरांमध्ये 367 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 242 तर महिला 125 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 287 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 243 अहवाल निगेटिव्ह तर 44 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 36 हजार 651 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 31 हजार 216 आहे. 5 हजार 190 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 445 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 378 आहे.