कणकवली : केंद्रीयमंत्री नारायण राणेंना शॉक बसला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. राणे यांचा रेलिंगला हात लागल्यानंतर त्यांना शॉक बसला. राणे यांची जनआशिर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पोहोचली. त्यावेळी ही घटना घडली आहे. यावेळी प्रविण दरेकर आणि नितेश राणेही उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकसत्रामुळे रखडलेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सिंधूदूर्गातून सुरु झाली आहे. दरम्यान, एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. आताचा हा धक्का राजकीय धक्का नसून तो खराखुरा धक्का बसला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कणकवलीमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांना विजेचा धक्का बसला आहे. कणकवलीमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना रेलिंगला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईला हात लावला असता नारायण राणे यांना इलेक्ट्रीक शॉक लागला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये राणेंना कसलीही गंभीर दुखापत झाली नाहीये. त्यांच्या मागे असलेले प्रवीण दरेकर यांनीही शिताफिने रेलिंगला लावलेला आपला हात मागे घेतल्याचं दिसून आलं. सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यात केलेली ही विद्युत रोषणाई किती महागात पडू शकते, हे दिसून आलं.
नारायण राणेंनी चालताना रेलिंगचा आधार घेतला. त्यावेळी एक ठिकाणी राणेंना जोरदार करंट लागला. तेव्हा राणेंना आपला हात जोरात झटकला आणि बाजूला झाले. राणेंनी सोबत असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरांनाही त्या ठिकाणी करंट लागत असल्याचं सांगत सावध केलं आणि बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर राणेंनी संबंधितांना सूचना देत तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. दरम्यान, व्हिडीओमध्ये राणेंना जोराचा करंट लागल्याचं पाहायला मिळत आहे. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.