सोलापूर : आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून एमआयएमची मोर्चेबांधणी करण्यासाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादात आज रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. तर त्यानंतर महिनाभरात खासदार असोदद्दीन ओवेसी सोलापूरचा दौरा करणार असल्याची माहिती एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली.
शहराध्यक्ष फारूख शाब्दी, नगरसेवक गाझी जहागीरदार, नगरसेवक अझहर हुंडेकरी या तीन नेत्यांनी नुकतीच हैदराबाद येथे पक्षाचे नेते खासदार असोदद्दीन ओवेसी, पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर यांची भेट घेतली. शहराध्यक्ष फारूख शाब्दी यांची ओवेसी यांच्यासोबत चर्चा झाली. तुम्ही चांगले काम करत आहेत, माझे कायम सोलापूरकडे लक्ष असते, येणारी महापालिका निवडणूक आपणास पूर्ण ताकदीने लढवायची आहे असे सांगत महिनाभरात मी सोलापूर दौरा करणार असल्याचे खासदार ओवेसी यांनी आश्वासन दिल्याचे शाब्दी यांनी सांगितले.
कोरोना पार्श्वभूमीवर ओवेसी यांची सभा नसेल पण समाजातील प्रमुख मान्यवर, पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांची ते भेट घेणार असल्याचं सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अनेक दिवसानंतर जिल्हा निरीक्षक अन्वर सादात हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत, ते बैठक घेऊन आढावा घेतील.
राज्यातील १६ महापालिकेच्या निवडणुका या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यादृष्टीने एमआयएम पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खासदार ओवेसी लवकरच सोलापुरात येऊन मेळावा घेणार आहेत. त्या दिवसापासून एमआयएम महापालिकेचे रणशिंग फुंकणार आहे. सोलापूर शहरात मुस्लीम समाजात एमआयएम पक्षाची चांगली क्रेझ आहे. ही क्रेझ २०१४ विधानसभा २०१७ मालपालिका व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आली आहे. २०१४ च्या निवडणुकीत पहिल्याच वेळी एमआयएमचे तब्बल नऊ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे एमआयएमची ताकद संपूर्ण शहराला दिसून आली. त्यानंतर गेल्या चार-पाच वर्षात बऱ्याच घडामोडी झाल्या. तौफिक शेख यांनी एमआयएम पक्ष सोडला.
त्याच दरम्यान एमआयएममध्ये युवा नेते फारुख शाब्दी यांची एन्ट्री झाली. त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे आणि शहराचे अध्यक्षपद देण्यात आले. याचबरोबर त्यांना २०१९ मध्ये विधानसभेचे तिकीट मिळाले. यावेळी शाब्दी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना जोरदार टक्कर दिली, तौफिक शेख यांच्या पेक्षा जास्त मते त्यांनी मिळवली. विशेष म्हणजे एमआयएमच्या सहा ते सात नगरसेवकांनी शाब्दी यांचे निवडणुकीचे काम केले नाही. तरीही पक्षाच्या जोरावर त्यांनी आमदार शिंदे यांना कडवी झुंज दिली. सध्या तौफिक शेख यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे पक्षाची धुरा एक हाती शाब्दी यांच्यात आलेली आहे. शाब्दी यांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत किमान १५ ते २० नगरसेवक निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.
याचीच चर्चा करण्यासाठी नुकतेच फारुख शाब्दी नगरसेवक गाझी जहागीरदार, नगरसेवक अशहर हुंडेकरी यांनी हैदराबादवारी केली. पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादाद यांची भेट घेऊन ते पुढे पक्षाचे नेते खासदार अससुदीन ओवैसी यांच्या भेटीला गेले. त्याठिकाणी फारुख शाब्दी यांचीच ओवेसी यांच्या सोबत चर्चा झाली. ‘तुम्ही चांगले काम करत आहेत, माझे कायम मोलापूरकडे लक्ष असते. येणारी महापालिका निवडणूक आपणास पूर्ण ताकदीने लढवायची आहे असे सांगत महिन्याभरात सोलापूर दौरा करणार असल्याचे खासदार ओवेसी यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्या दोन्याच्या वेळी एमआयएम महापालिकेचे रणशिंग फुंकणार आहे.