पुणे : पुण्यातील शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लघंन करण्यात आले. लांडे यांच्या मुलाच्या लग्नाला 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी लांडे यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
देशभरात कोरोना महामारीने हाहा:कार माजवला आहे. राज्यातही कोरोनाने थैमान घातलं आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आटोक्यात आलेली नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू आहे. अशात कोरोना काळात नियम मोडून मुलाच्या लग्नात 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवली म्हणून नवरदेवाचे वडील,सासरे व मंगल कार्यालय मालक यांच्यासह अन्य 6 जणांवर जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बारव येथे झालेला हा शाही लग्नसोहळा दोन दिवस मोठा चर्चेत होता. अनेक राजकीय मंडळी आजी माजी आमदार, आजी माजी सदस्य या लग्नसोहळ्याला उपस्थिती होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जुन्नर,अकोला,ठाणे येथील आमदार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे,बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे, चैतन्य उल्हास मिंडे आणि सुधीर नामदेव घिगे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
28 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास मौजे, बारव गावचे हद्दीत कडे जाणाऱ्या रोडवर महालक्ष्मी मंगल कार्यालय इथे हा लग्न सोहळा पार पडला. याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात तसेच सध्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. पुण्यात सध्या जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील सदर ठिकाणी देवराम सखाराम लांडे यांनी जमाव जमवून गर्दी केली आहे. म्हणून जुन्नर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव पुढील तपास करत आहेत.
* बाळे येथे फरशीने मारहाण वायरमन जखमी