कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आता राणेंनी मोठे गौप्यस्फोट केले. ‘माझ्याकडून ठाकरे कुटुंबियांना त्रास होणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिला होता. मात्र, संजय राऊत आम्हाला बोलायला भाग पाडतो, त्यामुळे बोलावं लागतंय. तसेच माझी प्रकरणं बाहेर काढायची आहेत तर काढा मग ‘त्या’ हत्या करायला कुणी सांगितल्या याची पण चौकशी करा, असेही ते म्हणाले.
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज समारोप होत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करतानाच सामंजस्याची भूमिकाही व्यक्त केली.
शिवसेना घडायला आमचाही काही तरी हातभार आहे. जेव्हा साहेबांना धोका होता. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं लगेच मातोश्री सोडा. साहेब अज्ञातस्थळी जाणार होते. साहेबांनी मला बोलवलं. म्हणाले, राणे तू तुझी टीम घेऊन बरोबर ये. कुणाला सांगू नको. मी घरातून निघालो की तुझ्या गाड्या पाठी आल्या पाहिजेत. त्याप्रमाणे आम्ही गेलो. जेवढे दिवस साहेब अज्ञातस्थळी होते. तेवढे मी दिवस झोपलो नाही. साहेबांना दहशतवाद्यांकडून धोका होता. रात्री गाडीत झोपायचो. जागाही नव्हती. बंगल्याच्या बाजूला गाडीत झोपायचो. एवढे लोकं होतो आम्ही. खायाला कुठून तरी आणायला सांगायचो. नाही तर रात्री माँ साहेब काही तरी द्यायच्या, असं राणे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला अतिरेक्यांचा धोका होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मातोश्री सोडायला सांगितले. तेव्हा बाळासाहेबांनी मलाच त्यांच्या संरक्षणासाठी बोलावलं. अज्ञातस्थळी मला घेऊन गेले. उद्धव ठाकरेंना नाही, असा पलटवार नारायण राणे यांनी केला. साहेब म्हणाले, राणे तुझी टीम घेऊन बरोबर ये. कुणाला सांगू नको. जेवढे दिवस साहेब अज्ञातस्थळी होते. तेवढे मी दिवस झोपलो नाही, असेही ते राणे म्हणाले.
तेव्हा बाळासाहेबांनी मलाच त्यांच्या संरक्षणासाठी बोलावलं. अज्ञातस्थळी मला घेऊन गेले. उद्धव ठाकरेंना नाही, असा पलटवार नारायण राणे यांनी केला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे अज्ञातस्थळी असल्याच्या अनुभवालाही उजळणी दिली.