नवी दिल्ली : भारताच्या भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) पॅरालिम्पिक गेम्समध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भावना पटेलला 31 लाख रुपये देणार आहे. टीटीएफआयचे अध्यक्ष आणि हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी ही माहिती दिली. रविवारी 34 वर्षीय भाविनाला अंतिम फेरीत चीनच्या जागतिक नंबर 1 यिंग झोयूने 11-7, 11-5, 11-6 असे पराभूत केले.
टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा 3-0 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा 3-2 असा पराभव केला होता.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लहान किराणा दुकान चालवणाऱ्या हसमुखभाई पटेल यांची मुलगी असलेली भाविना सुवर्ण पदकाची दावेदार मानली जात होती पण अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूनकडून पराभव झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भाविनाच्या या उत्कृष्ट कामगिरीने इतिहास रचला आहे.