मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटिस पाठवली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून याची माहिती दिली. जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असं राऊत यांनी ट्विट केलं. तसेच कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, असं ते म्हणाले.
यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खास पोस्ट केली आहे. शाब्बास ! जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू…
जय महाराष्ट्र, अशी पोस्ट केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गेल्या मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्याच रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटकाही झाली. पण नारायण राणे यांच्या अटकेमध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे राणे यांच्या अटकेमागे अनिल परब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, भाजपाने चहूबाजुंनी अनिल परब यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असं बोललं जातंय. याआधी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या अटकेमागे अनिल परब असल्याचा भाजपचा आरोप आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय कुरघोडी करण्यासाठी ही नोटीस पाठवली असल्याची टीका शिवसेनेकडून केली जात आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांना कोणतीही क्लिनचीट दिले नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI च्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याच्या अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. त्यातच आता सीबीआयने यावर स्पष्टीकरण दिले. अनिल देशमुखांना कोणतीही क्लिनचीट देण्यात आलेली नाही. अद्याप याप्रकरणी चौकशी सुरु आहे. अनिल देशमुखांवर पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने ही माहिती दिली आहे.