सोलापूर : सर्व क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आलेला असूनही अजून देवस्थाने उघड्यात आलेली नसल्याने जनक्षोभ वाढत आहे. राज्य शासनाने याकडे लक्ष द्यावे व योग्य ती पावले उचलत मंदिरे उघडावीत यासाठी, आज भाजपने दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी उत्तर राज्य शासनाच्या विरोधात मल्लिकार्जुन मंदिर, बाळी वेस येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
उद्धवा अजब तुझे सरकार, मंदिर बंद, उघडले बार..,उद्धवा धुंद तुझे सरकार,असे म्हणत सोलापूर शहर जिल्ह्यात मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज बाळीवेसमध्ये मल्लिकार्जुन मंदिर समोर निदर्शने करण्यात आली….
राज्यातील महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली सरकारने राज्यातील बार उघडले मात्र मंदिरे अजूनही उघडली नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध नोंदवण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या आंदोलनात आमदार सुभाष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्यासह पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कोरोनाचे नियम तोडून हे आंदोलन भारतीय जनता पार्टीने केल्याने पोलिसांनी या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
मात्र दक्षिण सोलापूरच्या आमदारानी उत्तर सोलापूरच्या मतदारसंघात आंदोलन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र आमदार विजयकुमार देशमुख आजारी असल्याने आमदार सुभाष देशमुखांनी उत्तरमधील आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन केल्याचे वृत्त आहे. थोडक्यात देशमुखांची कसर दुस-या आमदार देशमुखांनी भरुन काढली.