मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी ‘ठाकरे सरकार की महान इलेव्हन’ म्हणत 11 जणांची नावं जाहीर केली आहेत. यात प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजवर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लक्ष घालत गंभीर आरोप केले आहेत. आता तर त्यांनी अकरा जणांची यादीत ट्वीट केली आहे. किरीट सोमय्यांच्या यादीतलं पहिलं नाव आहे प्रताप सरनाईक. NSEL मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली होती.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1432136125607383040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1432136125607383040%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmumbai%2Fbjp-leader-kirit-somaiya-thackeray-sarkar-ki-mahan-eleven-somaiya-allegation-on-maha-vikas-aghadi-leader-1001277
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटींच्या वसूलीचा आरोप केला. आणि तेव्हापासून अनिल देशमुख ईडीसह भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले. ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी समन्सही बजावला, मात्र देशमुख ईडीसमोर आले नाही.
राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते अनिल परब यांचं नाव तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानुसार काल सोमवारी अनिल परब यांना ईडीची नोटीस आली. यावर किरीट सोमय्यांनी परबांवरच्या आरोपांची यादी वाचून दाखवली. सचिन वाझे प्रकरण असो, आरटीओमधला गैरव्यहार आणि दापोलीमध्ये बांधलेलं रिसॉर्ट असा अनेक गोष्टींवरुन किरीट सोमय्या यांनी अनिला परब यांच्या निशाणा साधला.
शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या. त्याआधी भाजपनं भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या आहेत. यावर भावना गवळी यांनी केंद्र सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला. यावरुन आता चांगलेच राजकारण पेटले आहे.