बंगळुरु : कर्नाटकमध्ये ऑडी कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरू शहरातील कोरोमंगलामध्ये ही दुर्घटना घडली. साधारण रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. दरम्यान, यात तामिळनाडूमधील होसूरच्या डीएमके आमदाराचा मुलगा आणि सूनेचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. करुणा सागर आणि बिंदू अशी त्यांची नावे आहेत.
आलिशान ऑडी कार रस्त्याशेजारील विजेचा खांब आणि इमारतीवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात द्रमुक आमदार वाय प्रकाश यांच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू झाला. भरधाव ऑडी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑडी कार अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्नाटकातील बंगळुरु शहरातील दक्षिणेला असलेल्या कोरमंगल भागात सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या शेजारी असलेल्या बिल्डिंग आणि विजेच्या खांबावर भरधाव वेगात असलेली ऑडी कार धडकली.
या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने हॉस्पिटलला नेत असताना वाटेत प्राण सोडला. तामिळनाडूतील होसुरचे द्रमुक आमदार व्हाय प्रकाश यांचे पुत्र करुणा सागर आणि सून बिंदू यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खुद्द आमदार वाय प्रकाश यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र इतर मृतांची नावं अद्याप समजेलली नाहीत.
* मुंबईत झाला होता अपघात
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही दिवसांपूर्वी रेंज रोवर कारचा मोठा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून कार चालक वाचला आहे. मात्र यात गाडीचं मोठं नुकसान झालं होतं. अपघातग्रस्त रेंज रोवर कारवर खासदाराचा लोगो लावल्याचे निदर्शनास आले. नंबरप्लेटवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळही दिसून आले.