Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरातील बोगस डॉक्टरावर कारवाई, सात वर्षापासून अवैधपणे वैद्यकीय धंदा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पंढरपुरातील बोगस डॉक्टरावर कारवाई, सात वर्षापासून अवैधपणे वैद्यकीय धंदा

Surajya Digital
Last updated: 2021/09/03 at 3:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून त्याच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी ही कारवाई केली. बोगस डॉक्टराची शोध मोहिम राबवण्यात येत असून तुगंत गावात रॉय बिवास बिरेन (वय ३८ रा. पं. बंगाल) हा व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णावर औषधोपचार करत असल्याच कारवाई वेळी आढळून आलं. यावेळी या पथकाला गावातील एस.टी. स्टँडजवळ खंडेराव उत्तम रणदिवे यांच्या मालकीच्या खोलीत संबंधित डॉक्टर मिळून आला. चौकशीअंती त्याचे नाव रॉय बिवास बिरेन (वय ३८, रा. घाट पातीला, ता.वनगाय, जि. चोवीस परणाना, पश्चिम बंगाल, सध्या रा. तुंगत) असे आहे.

गेल्या सात वर्षापासून अवैधरीत्या वैद्यकीय धंदा करून तुंगत (ता. पंढरपूर) व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्या जिवास धोका निर्माण करणाऱ्या बोगस डॉक्टरावर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी बुधवारी कारवाई केली. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र आढळले नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पथक पोहोचले तेव्हा त्या रुग्णालयात एक महिला रुग्णाला सलाईन लावलेले होते. रुग्णाला औषध उपचारासाठी डायक्लो फॅनिक, डेम्जा मिर्थेसॉन व अन्य औषधे त्याच्याजवळ आढळून आली. तपासादरम्यान गेल्या सात वर्षांपासून तो रुग्णांवर उपचार करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलेेे.

तपासणी पथकाने संबंधित डॉक्टर ज्या पॅथीचे उपचार करतो त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ किंवा इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९६५ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राबाबत विचारले. त्याच्या दवाखान्यामध्ये दर्शनी भागावर कोठेही नोंदणी प्रमाणपत्र लावले नव्हते. त्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले.

गावकऱ्यांसमोर या घटनेचा पंचनामा करण्यात आला. दवाखान्यात सापडलेली औषधे व खरेदी केलेल्या औषधांची बिले पाहता ते मॉडर्न मेडिसीन म्हणजे ॲलोपॅथीचा व्यावसाय करत असल्याचे दिसून आले. मात्र असा व्यवसाय करण्यासाठी लागणारे वैद्यकीय पदवी व नोंदणी प्रमाणपत्र त्यांच्याकडे मिळून आले नाही. यामुळे त्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६चे कलम १५(२) व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (२) नुसार तसेच भादवि कलम ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Action #against #bogusdoctor #Pandharpur #illegal #medical #profession #sevenyears, #पंढरपुरातील #बोगस #डॉक्टरावर #कारवाई #सातवर्षापासून #अवैधपणे #वैद्यकीय #धंदा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे
Next Article मुंबईसह सोलापुरात ताप, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?