मुंबई / सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट असताना; मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो या आजारांचा ताप वाढला आहे. सद्य परिस्थितीत मुंबई शहरात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगानं वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत मलेरियाचे ७९० रुग्ण सापडले आहेत. तसेच यावर्षी शहरात आतापर्यंत डेंग्यूचे २०९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिरड्यांमधून अथवा नाकातून रक्तस्त्राव होणे, आतड्यांमध्ये रक्तस्राव होणे व तो काळ्या विष्ठेच्या स्वरूपात बाहेर पडणे प्रचंड अशक्तपणा येऊन भोवळ येणे, डेंगुच्या आजारात रक्तातील प्लेटलेट पेशी (रक्त गोठवण्यात मदत करणाऱ्या रक्त कणिका) कमी होत असतात हे सर्वज्ञात आहे. विशेषतः ताप गेल्यानंतर प्लेटलेट पेशी कमी होण्यास सुरुवात होते. साधारणतः चार ते पाच दिवसात पेशी वाढायला सुरुवात होते.
मुंबई पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यूची पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर १३२ पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत मलेरियाचे ७९० रुग्ण सापडले. यावर्षी शहरात आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण २०९ रुग्णांची नोंद केली आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या ३३३८ रुग्णांची नोंद केली आहे. तसंच गेल्या आठ महिन्यात गॅस्ट्रोच्या १८४८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बहुतेक रुग्ण हे एफ दक्षिण (परेल, शिवडी, नायगाव), बी (डोंगरी, उमरखाडी) आणि एच पश्चिम (वांद्रे, खार आणि सांताक्रूझ) येथे आढळून आली आहेत. मात्र या भागात मृत्यूची नोंद नाही आहे.
* सोलापूर शहरातही वाढ
सोलापूर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात २४२ रुग्ण आढळून आले होते त्यापैकी ११० पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेची यंत्रणा उभी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तरी देखील शहरातील हॉस्पिटल फुल्ल झाली आहेत. तर आता पर्यंत तिघांचा डेंग्यूमुळे बळी गेला आहे. शहरात डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ताप, डोके दुखी लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे. अशा रुग्णांची खाजगी तसेच पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. ऑगस्ट मध्ये २४२ संशयित रुग्ण आढळले आहेत यापैकी सुमारे ११० रुग्णांचा रिपोर्ट डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूला आळा घालण्यासाठी मोठी यंत्रणा उभी केली आहे. शहराच्या विविध भागात पुवारणी फवारणीसाठी मलेरिया विभागाचे १२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच सव्हँसाठी २५० शिक्षक, २७५ आशा वर्कर, तसेच इतर कर्मचान्यांची नियुक्ती केली. आहे. महापालिकेच्या डफरीन रुग्णालयात १५ बेडचा कक्ष उपचारासाठी तयार केले असून या माध्यमातून येणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. डेंग्यूची तपासणी देखील माफक दरात पालिका प्रशासनाने उपलब्ध केली आहे.