मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच यावेळी त्यांनी बोलताना अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मला माझ्या पतीच्या मुलीच्या वयाची मुलगी फोन करून धमकी देत आहे. पण मी कोणालाही घाबरत नाही. जी मुलगी तिच्या बापाच्या वयाच्या माणसाबाबत चुकीचे काम करते अशा मुलीना तर मी अजिबात घाबरत नाही. ती मुलगी दुसऱ्यावर प्रेम करते. हे तिला पैसे देऊन तिच्यामागे लागले आहेत. सामान्य जनतेचा पैशाचा असा गैरवापर केला जात आहे. राजकारणातील मुठभर लोक जनतेचा पैसा अशा पोरींवर उडवत आहेत.’ असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. धनंजय मुंडे काही काळा पूर्वी चर्चेत होते. करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत जनतेसमोर आल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आतापर्यंत मला खूप वेळा धमकावलं गेलं आहे. माझ्या हाती अनेक गोष्टी लागल्या आहेत. त्या मी सोशल मीडियावर शेअर करणार तोच मला माझ्या मुलीच्या वयाच्या एका तरुणीने फोन करुन धमकावलं. मी तिला अजिबात घाबरणार नाही’, असंही करुणा मुंडे या फेसबुक लाईव्हमध्ये म्हंटलं आहे.
तसेच धनंजय मुंडे यांनी आता त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील अडचणीत ओढले असल्याचे पहायला मिळत आहे. ‘माझ्या नवऱ्याने मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अजितदादांच्या देखील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.’ असे वक्तव्य करूणा मुंडे यांनी केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. करूणा मुंडे म्हणाल्या, पंकजाताई, २०२४ च्या निवडणुकीत मी तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या पाठिशी उभं राहणार आहे. पंकजा मुंडे या माझ्या नणंद लागतात. घरातल्या आहेत असं म्हणत करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी लोकही आज त्यांच्याच मुलींना मागे टाकत आहेत. पंकजा मुंडे यांच्या विरोधात काय षड्यंत्र आखलं जात आहे? हेही मी माध्यमांसमोर मांडणार आहे. माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस. मी तिचं ऐकलं नाही म्हणून भोगत आहे, असंही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.