Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईकर महिलेचा दानयज्ञ, टाटा मेमोरियल रुग्णालयाला 120 कोटींची जमीन दान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुंबईकर महिलेचा दानयज्ञ, टाटा मेमोरियल रुग्णालयाला 120 कोटींची जमीन दान

Surajya Digital
Last updated: 2021/09/06 at 9:51 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई :  मुंबईत कर्करोगावर उपचार करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे देशातलं सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे अपुरी जागा असल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. मुंबईतल्या एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची 120 कोटी रुपयांची जमीन ही टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दान केली आहे. मुंबईतल्या 61 वर्षीय वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित असलेली 30 हजार चौरस फुटांची जागा आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर असलेली ही जमीन एका दानशूर महिलेनं देणगी म्हणून दिली आहे.

मुंबईतील टाटा रुग्णालयाला जमीन दान करण्यात आली आहे. याची किंमत जवळपास 120 कोटींच्या घरात आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असते. त्यामुळे अनेकांना वाट पाहत थांबावे लागते. त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेनं तिच्या मालकीची अंदाजे 120 कोटी रुपये किंमतीची जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबईतील 61 वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित तीस हजार चौरस फुटाची जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. तर आणखी 18 दानशूर व्यक्तींनी त्या ठिकाणी केंद्राच्या बांधकामासाठी एकत्रितपणे देणगी दिली आहे. ही रक्कमही जवळपास 18 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.

मेहेरबाई टाटा यांचे 1932 मध्ये रक्ताच्या कर्करोगानं निधन झालं. त्यांचे पती दोराबजी टाटा यांना त्यांच्या पत्नीवर उपचार करणाऱ्या रुग्णालयासारखी सुविधा भारतात आणायची होती. दोराबजींच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी नोरोजी सकलटवाला यांनी त्यांचे प्रयत्न पुढे सुरू ठेवले. शेवटी, जेआरडी टाटांच्या पाठिंब्याचा परिणाम म्हणून मुंबईतील कामगार वस्ती असलेल्या परेलच्या मध्यभागी टाटा मेमोरियल हॉस्पिटल या सात मजली इमारतीचे स्वप्न 28 फेब्रुवारी 1941 रोजी साकार झाले.

टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे भारतातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. इथे कॅन्सर पीडित रुग्णांची उपचारासाठी मोठी गर्दी होते. टाटा रुग्णालयात भारतातील कर्करोगाच्या जवळपास एक तृतीयांश रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. इथे प्राथमिक चिकित्सेसाठी आलेल्या साठ टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.  सध्या रुग्णालयात केमोथेरपीसाठी शंभर बेड असून रोज 500 रुग्णांना केमोथेरपी दिली जाते, असे असले तरी आजही रुग्णांना केमोथेरपीसाठी तीस दिवसांची वाट पहावी लागते.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Mumbai #woman #Donates #landworth #120core #TataMemorial #Hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बेळगावात दणदणीत विजय भगवा फडकला पण भाजपचा !
Next Article शेतबांधावरुन महिलेचा खून, खुनाच्या संशयावरून दिराला झाली अटक

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?