Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/09/07 at 10:21 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : खेळत असताना घराशेजारी पावसाच्या पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षांचा बालक दगावला. ही दुर्घटना टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे काल सोमवारी (ता. ६) सायंकाळच्या सुमारास घडली.

श्रेयस बिरप्पा उडगी (वय ६ वर्षे, रा टाकळी) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत होता. त्यावेळी शेजारच्यांनी खोदलेल्या खड्ड्यात पाय घसरून पाण्यात पडला. या घटनेची नोंद मंद्रूप पोलिसात झाली. हवालदार असादे पुढील तपास करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी ब्रिज येथील  ग्रामपंचायतीसमोर असलेल्या अनिल देवानंद लाड यांनी शौचालय बांधकाम करण्यासाठी मारलेल्या खड्ड्याने या चिमुकल्याचा जीव घेतला आहे. शौचालय बांधकाम सुरू करून अनेक दिवस झाले असूनही ते अद्यापही पूर्ण न केल्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तो खड्डा पूर्ण पाण्याने भरले आहे. त्यात पाण्याचा अंदाज न लागल्याने  श्रेयश त्या चार फूट  खड्ड्यात पडला. श्रेयशने जीव गमवला.

शौचालय खड्डा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन वेळा नोटीस बजावली असून देखील त्याकडे दुर्लक्ष करून सदर बांधकाम अर्धवट सोडून दिल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचे गावक-याचे म्हणणे आहे. अनिल लाड  यांच्या हलगर्जीपणामुळे  शौचालय बांधकाम अनेक महिने अपूर्ण ठेवल्याने  त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी टाकळी येथील नागरिकांमधून होत आहे.

“ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही जेसीबीच्या साहाय्याने शौचालय खड्डा बुजवण्यासाठी गेले असता लाड कुटुंबानी आम्ही नंतर बुजवून घेतो म्हणून जेसीबी परत पाठवून दिले आहे. त्यांना खड्डा बुजवण्यासाठी कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे”

अमोगसिद्ध माळगोंडे – ग्रामसेवक

 

* उंबरेपागे येथे दोन गटात कुऱ्हाड, दगडाने मारहाण, महिलेसह चौघे जखमी

सोलापूर – घरजागेच्या वादातून गायकवाड आणि दरवेशी यांच्या गटात कुऱ्हाड दगड आणि काठीने केलेल्या मारहाणीत महिलेसह चौघेजण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास उंबरेपागे (ता. पंढरपूर) येथे घडली. सर्व जखमींना करकंब येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रागुबाई बाळू गायकवाड (वय४०) विजय शंकर गायकवाड (वय४०) अशी पहिल्या गटातील जखमींची नावे आहेत. त्यांना रशिद अमीन दरवेशी, हनीफ दरवेशी आणि अन्य चौघांनी कुर्हाड आणि दगडाने मारहाण केली.  हनीफ अमीन दरवेशी  (वय२८) त्याचा भाऊ रशीद दरवेशी (वय३५) अशी दुसऱ्या गटातील जखमींची नावे आहेत. त्यांना बाळू गायकवाड, अविनाश गायकवाड आणि अन्य दोघांनी दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अशी नोंद पोलीसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #child #dies #falling #pit #filled #water, #पाण्याने #तुंबलेल्या #खड्ड्यात #पडल्याने #बालकाचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतबांधावरुन महिलेचा खून, खुनाच्या संशयावरून दिराला झाली अटक
Next Article पोलीस भरतीत कमी मार्क दिले म्हणून फौजदाराला मारहाण, क्रेनच्या धडकेत तरुण ठार

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?