Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलीस भरतीत कमी मार्क दिले म्हणून फौजदाराला मारहाण, क्रेनच्या धडकेत तरुण ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलीस भरतीत कमी मार्क दिले म्हणून फौजदाराला मारहाण, क्रेनच्या धडकेत तरुण ठार

Surajya Digital
Last updated: 2021/09/07 at 2:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पोलीस भरतीच्या वेळी मला कमी मार्क दिले, त्यामुळे मी पोलीस झालो नाही. याचा राग धरून सळई आणि हाताने केलेल्या मारहाणीत फौजदार जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास जुळे सोलापुरातील बनशंकरी नगरात घडली. या प्रकरणात विजापूर नाका पोलीसांनी कपिल बाजीराव खरात (वय ४१ रा.बनशंकरी नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलीस आयुक्तालयातील फौजदार अविनाश नामदेव घोडके (वय५६ रा. म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर) हे काल दुपारी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन प्रसाद नगर येथे निघाले होते. बनशंकरी नगराजवळ  कपिल खरात याने त्यांची दुचाकी अडवली. आणि तुझ्यामुळेच मी पोलीस झालो नाही, असे म्हणत त्याने मारहाण केली. त्यावेळी फौजदार घोडके यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन कपिल खरात याला ताब्यात घेतले. हवालदार उपासे पुढील तपास करीत आहेत .

* क्रेनच्या धडकेने, मध्य प्रदेशचा तरुण ठार

सोलापूर : रस्ता दुरुस्तीकरणाऱ्या क्रेनच्या धडकेने मध्यप्रदेश येथील पायी जाणारा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात पुणे महामार्गावरील केगाव नजीक असलेल्या एसएसडीपीएल कंपनी जवळ रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रविशंकर बसेरीलाल मरावी (वय २७ रा. शिवनी, मध्यप्रदेश) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो केगाव येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करीत होता. रात्रीच्या सुमारास तो मोहनलाल वाडिया (रा. शिवनी) याच्या सोबत गावात जाऊन दोघे कारखान्याच्या दिशेने पायी निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून क्रेन धडकल्याने तो गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मरण पावला. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. पोलीसांनी दिगंबर अभिमान पांढरे (रा. चिंचोळी, ता. मोहोळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक निरीक्षक मंडले पुढील तपास करीत आहेत.

* घरात घुसून तरुणीचा विनयभंग 

सोलापूर : परिचयातील तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविले, त्यानंतर तिच्या घरात बसून विनयभंग केल्याची घटना  घडली. या प्रकरणात जेलरोडच्या पोलिसांनी पुष्कराज आप्पाराव घोडके (रा.२५६ गाळा, रविवार पेठ) याच्याविरुद्ध विनयभंग आणि माहितीतंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला.
पुष्कराज घोडके हा त्या तरुणीच्या मोबाईलवर नेहमी अश्लील मेसेज पाठवीत होता. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ती तरुणी एकटी असताना तुझ्यावर अत्याचार करून आयुष्याचे वाटूळ करतो, अशी धमकी दिली आणि तिच्याची असभ्य वर्तन केले. अशी नोंद पोलिसात झाली. पोलीस निरीक्षक राऊत पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Police #beat #criminal #lowmarks #recruitment #young #man #Collision, #पोलीसभरती #मार्क #फौजदार #मारहाण #क्रेनच्या #धडकेत #तरुण #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
Next Article बलात्कार प्रकरण – सलमान खान, अक्षय कुमारवर गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?