Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात १५० केंद्रांवर आज एकाच दिवशी २ लाख कोरोना लसींची मिळणार डोस, पुणे आणि सोलापूरची तुलना नको
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात १५० केंद्रांवर आज एकाच दिवशी २ लाख कोरोना लसींची मिळणार डोस, पुणे आणि सोलापूरची तुलना नको

Surajya Digital
Last updated: 2021/09/11 at 7:24 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला दोन लाख लसींची डोस मिळाले आहेत. आज शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर २ लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोनामुक्त करण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जलदगतीने अधिकाधिक लस मिळावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरसाठी अधिक लसींची उपलब्धता करून घेतली आहे.

लसीकरणासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागाला नेटके नियोजन करून दिले आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आजवर जिल्ह्यातील १६ लाख १४ हजार २० लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आजवर ५५ वेळा कोविशिल्डची लस १४ लाख २२ हजार ८४० तर २८ वेळा कोव्हॅक्सीनची ८२ हजार ६४० इतके डोस आले. यातून ८ ऑगस्टपर्यंत ११ लाख ७४ हजार ३१० जणांना पहिला तर ४ लाख ३९ हजार ७२० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण लसीकरण १६ लाख १४ हजार ३० इतके झाले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लसीकरण सुरू झाल्यापासून एकाच दिवशी ७७ हजार ८४० इतके विक्रमी लसीकरण एकाच दिवसात झाले आहे. एका केंद्रावर जवळपास ८०० ते १२०० डोस देण्यात आले आहेत. यात ग्रामीणमध्ये ६५ हजार ७२१ तर ग्रामीण भागात १२०४९ इतके लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यात लसीकरणात टॉप असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी न थकता काम केल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

आगामी काळात निश्चितपणे लसीकरणात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर नक्कीच येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात आधी सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आहे. सोलापूर जिल्हावासियांनी शासनाने सूचित केलेल्या नियमांचे पालन करून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची कोरोनापासून काळजी घ्यावी. गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

* पुणे आणि सोलापूरची तुलना नको

सोलापूरची तुलना पुण्याशी नकोच सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हा मोठा आहे. सिरम इन्स्टिट्यूटसह विविध सामाजिक संस्था व संघटना पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसींची उपलब्धता करून देत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण होत आहे. आज राज्यामध्ये सर्वाधिक लसींचे डोस सोलापूर जिल्ह्याला मिळत आहेत. लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. ही समाधानाची बाब आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सतत संवाद साधून सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक लसीचे डोस उपलब्ध करून देण्याबाबत माझा पाठपुरावा सुरूच आहे. पुणे जिल्हा मोठा असल्याने त्या ठिकाणी विविध सामाजिक संघटनांकडून सर्वाधिक लसी पुरवल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणी अधिक लसीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्याबाबतीत सोलापूरची तुलना पुण्याशी करणे योग्य नाही.

जुलै २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी लसीचा कमी साठा मिळत होता. तो वाढवून द्याव्या. यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मी, जिल्हाधिकारी शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्य विभागाकडे डोस वाढवून देण्याबाबत सातत्याने मागणी केली‌ होती, यामुळे जिल्ह्याला जादा लस मिळत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #dose #corona #vaccines #available #150centers #Solapur #sameday, #सोलापुरात #१५०केंद्रांवर #एकाचदिवशी #२लाख #कोरोनालसी #डोस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यातील १ हजार १३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर 
Next Article तैमुरने केली गणपती बाप्पाची पूजा; हाताने साकारला बाप्पा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?