Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पालिकेतील कर्मचारी बनला सराईत गुन्हेगार; 50 मोबाइलवर मारला डल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पालिकेतील कर्मचारी बनला सराईत गुन्हेगार; 50 मोबाइलवर मारला डल्ला

Surajya Digital
Last updated: 2021/09/11 at 6:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुणे महानगर पालिकेतील एक कर्मचारी डोक्यावर झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सराईत गुन्हेगार बनला. त्यानं कर्ज फेडण्यासाठी 50 महागडे फोन चोरले. दरम्यान आरोपी कर्मचारी रस्त्यावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चोरीचा मोबाइल विकत होता. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 88 हजार रुपये किमतीचे 21 मोबाइल जप्त केले आहेत. तानाजी शहाजी रणदिवे असं अटक केलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे.

दरम्यान आरोपी कर्मचारी रस्त्यावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चोरीचा मोबाइल विकत होता. पण पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्या पार्ट टाइम चोरीच्या व्यावसायाचं बिंग फुटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 88 हजार रुपये किमतीचे 21 मोबाइल फोन जप्त केले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तानाजी शहाजी रणदिवे असं अटक केलेल्या 33 वर्षीय आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे. आरोपी रणदिवे हडपसर परिसरातील रामटेकडी, शांतीनगर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागात काम करतो. मागील काही दिवसांपासून आरोपी रणदिवे याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपीनं मोबाइल चोरी करण्याचा नवीन पार्ट टाइम व्यवसाय सुरू केला होता. पण त्याचा हा लुटमारीचा व्यवसाय फार काळ टिकला नाही.

ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत असताना, आरोपी तानाजी रणदिवे याठिकाणी चोरीचे मोबाइल विकायला येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीवर नजर ठेवून होते. त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत त्याची चौकशी केली असता, त्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण पोलिसी खाक्या दाखवताच तो पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. तसेच कर्ज फेडण्यासाठी मोबाइल चोरी केल्याचं कबुल केलं आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Municipal #employees #criminals #Dalla #killed #mobiles, #पालिकेतील #कर्मचारी #सराईत #गुन्हेगार #मोबाइल #डल्ला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाणीप्रश्नी नाराजी व्यक्त करीत सत्ताधारी नगरसेवक चढले पाण्याच्या टाकीवर
Next Article बाळूमामांचा अवतार म्हणवणा-या मनोहर उर्फ मामा भोसलेस सुनावली पोलीस कोठडी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?