नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात ५.५ टक्के कपात केली आहे. सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत कच्च्या पाम तेलावर (सीपीओ) आयात शुल्क ३०.२५ वरून २४.७ टक्के केले आहे, तर रिफाईंड पाम तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरून ३७.७५ टक्के केले आहे.
खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा दिलासादायक निर्णय केंद्रानं घेतला आहे. सरकारनं आयात शुल्क तब्बल ५.५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात देशातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून गेल्या महिन्यात देखील खाद्य तेलावरील आयात शुल्कात घट करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात खाद्य तेलाच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारनं ३० सप्टेंबरपर्यंत कच्च्या पाम तेलावरील (Crude Palm Oil- CPO)आयात शुल्क ३०. २५ टक्क्यांवरुन २४.७ टक्के इतकं केलं आहे. तर रिफाइंड पाम तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरुन ३५.७५ टक्क्यांवर आणलं आहे. रिफाइंड सोया तेल आणि सनफ्लावर तेलावरील आयात शुल्क देखील ३० सप्टेंबरपर्यंत ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्के इतकं करण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खाद्य तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तेलाची साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सरकारनं दिला आहे. देशातील सर्व खाद्य तेल उत्पादक कंपन्या आणि होलसेल व्यापाऱ्यांकडून तेलाची साठेबाजी केली जाणार नाही. याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रातील राज्य सरकारांना दिल्या आहेत.
दरम्यान, सणासुदीच्या काळात दिलासादायक बाब म्हणजे आज इंधनांच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आज रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये घट झाल्यानंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असून नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. गणपती बाप्पा आगमनाच्या दिवशी देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये १० ते १५ पैशांपर्यंत पेट्रोल -डिझेलच्या किंमतीमध्ये घट करण्यात आली होती.
या महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला, १ सप्टेंबरला भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत १५ – १५ पैसे प्रति लिटरची कपात करण्यात आली होती. तसेच, ५ सप्टेंबर नंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये १५ – १५ पैशांची घट झाली होती. यावरून आठवडा भरात पेट्रोल-डिझेल ३० – ३० पैशांनी स्वस्त झाले.