Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहिल्यांदाच आमदारकी विजय होणारे भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

पहिल्यांदाच आमदारकी विजय होणारे भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री

Surajya Digital
Last updated: 2021/09/12 at 7:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झालं आहे. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात महाराष्ट्रात जन्मलेले चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचे नाव पिछाडीवर पडले आहे. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रिपद गेलं आहे.

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांच्या (Bhupendra Patel ) नावावर निश्चिती झाली आहे. भाजपच्या विधिमंडळ बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झाले. भूपेंद्र सिंह पटेल हे गुजरातच्या घाटलोदिया मतदारसंघातून आमदार आहे.

भाजपनं गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. भूपेंद्र पटेल हे 2017 साली गुजरात विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. तब्बल एक लाख 17 हजार मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोडिया मतदासंघातून 2017 ची निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत वासुदेवभाई पटेल यांचा पराभव केला होता. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रिपद गेलं आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

भाजप आज रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकी भूपेंद्र सिंह पटेल यांच्यावर नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

गुजरातमध्ये पुढे 2022 मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि असं मानलं जात की भाजपला विजय रुपाणींवर विश्वास नसल्यानेच हे राजीनामानाट्य झाले आहे. कोरोना काळात गुजरात सरकारचे अपयश हे देखील राजीनाम्याचे प्रमुख कारण आसल्याचे सांगितले जात आहे. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #BhupendraPatel #winning #MLA #firsttime #new #ChiefMinister #Gujarat, #पहिल्यांदाच #आमदारकी #विजय #भूपेंद्रपटेल #गुजरात #नवे #मुख्यमंत्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गुजरात मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर नाव असलेले चंद्रकांत पाटील कोण आहेत ?
Next Article मोदी सरकार नागरिकांसाठी युनिक हेल्थ कार्ड आणण्याच्या विचारात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?