Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पटवर्धन कुरोलीेत ‘जनशक्ती’ची बैठक, पंढरपुरात २१ सप्टेंबरला ट्रॅक्टर आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पटवर्धन कुरोलीेत ‘जनशक्ती’ची बैठक, पंढरपुरात २१ सप्टेंबरला ट्रॅक्टर आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2021/09/13 at 10:03 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : गेल्या अनेक वर्षांपासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक मालकांचे वाहतूकदर आणी कमिशन वाढवले नाहीच शिवाय त्यांच्यावर जप्ती सारख्या कारवाया कारखानदारांकडून केल्या जातात म्हणून आपल्या मागण्या कारखानदार व शासन दरबारी पोहोचविण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी पंढरपूरमध्ये जनशक्ती संघटनेचे ट्रॅक्टर आंदोलन होणार असल्याचे जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.

पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे ऊस वाहतूक दर यांच्या प्रश्नासंबंधी जनशक्ती संघटनेची पहिली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते याप्रसंगी बळीराजा जिल्हा प्रमुख रामदास खराडे, विठ्ठल मस्के, बळीराजा जिल्हा प्रमुख माऊली जवळेकर, किसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर, गणेश वायभासे, रोहन नाईकनवरे, रामभाऊ खटके, अंकुश उपाळे, सागर पाटील, सोमनाथ जाधव, प्रकाश पवार उपस्थित होते.

कारखानदारी अडचणीत असल्याचे सांगून कारखानदार नेहमीच शेतकऱ्यांना व ऊस वाहतुकदारांना अडचणीत आणत आहेत. मग अडचणीत असलेला कारखानदार एका कारखान्याचे २-४ कारखाने कसा उभा करतो हे न सुटलेलं कोडं आहे. मात्र जिवाची ओढाताण करुन यांच्या कारखान्याला ऊस पुरवठा करणारा अजुनही अडचणीतच आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

डीझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरांची किंमत वाढली तरीही वाहतूक कमिशन मात्र जैसे थे आहे. आपल्या जिवावर कारखानदार भले मोठे झाले मात्र ऊस वाहतुकदार ट्रॅक्टर व ट्रक मालकांची अधोगती झाल्याचा घणाघात अतुल खुपसे पाटील यांनी केला.

खूपसे पाटील म्हणाले, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते आज ते १०० च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजार च्या पुढे झाला आहे. आणि टायर यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक चे कारखानदारांनी वाहतूकदर आणी कमिशन आजही वाढवलेले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी चार ते पाच लाखांचा ऍडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादमाने सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याचे सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते. आणि याचा फटका त्यांना बसतो. असे अनेक घाव सोसल्याने हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. का आत्महत्या सारखा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे आपण वेळीच एकत्र होऊन कारखानदारांच्या विरोधात आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असे सांगितले.

राजाभाऊ भिले, तानाजी जाधव, सुनील टिक, बिभीषण गमे ,अनिल पाटील ,सचिन शिंगटे ,नितीन तकिक ,गोपाळ पाटील, ज्योतिराम शिंदे, राजेंद्र जांबरे,ज्योतिराम ढोबळे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीकांत नागणे, बालाजी पांढरे, विशाल माने, शिवाजी वळेकर, पोपट केचे, बंटी गायकवाड, कविराज मोहिते, सचिन गायकवाड, गणेश ढोबळे, राणा वाघमारे यांच्यासह इतर वाहन चालक मालक उपस्थित होते.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Janshakti #meeting #tractor #agitation #Pandharpur, #जनशक्ती #बैठक #पंढरपुरात #सप्टेंबर #ट्रॅक्टर #आंदोलन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता! तीन दिवस राज्यात कुठे-कुठे पडणार अतिमुसळधार पाऊस
Next Article काळ्याबाजारात विक्रीसाठी चाललेले साडेआठ लाखांचे डिझेल पकडले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?