Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अल्पवयीन मुलीशी संमतीने शरीरसंबंध हा बलात्कारच – हायकोर्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीशी संमतीने शरीरसंबंध हा बलात्कारच – हायकोर्ट

Surajya Digital
Last updated: 2021/09/13 at 4:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नागपूर : अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हाही बलात्कारच होतो, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. आरोपीने बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या सहमतीचा मुद्दा मांडला होता. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा आरोपीने केला. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मुद्दा फेटाळून लावत अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्यात काहीच महत्त्व नाही, असे निकालात नमूद केले.

घटनेवेळी पीडित मुलगी केवळ फक्त १४ वर्षाची होती. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते. आरोपीने २७ जून २०१६ रोजी तिला पळवून आत्याच्या घरी नेले. मुलीशी लग्न केल्याचे सांगितले. आत्याने त्या ठिकाणी दोन दिवस राहण्याची सोय केली. यातूनच शरीरसंबंध झाले. हे समजल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसाकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

या निर्णयामुळे चांगल्या-वाईटाची समज नसलेल्या अल्पवयीन मुलींना खाऊचे, इतर आमीष दाखवून वासनेची शिकार बनवणाऱ्या नराधमांना कठोर धडा मिळणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हाही बलात्कारच होतो, असे कोर्टाने स्पष्ट करून संबंधित आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निकाल दिला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरोपीकडून बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या सहमतीचा मुद्दा न्यायालयात मांडला होता. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा केला. कोर्टाने हा मुद्दा फेटाळून लावत अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच महत्त्व नाही, असे निकालात नमूद केले.

गजानन देवराव राठोड (रा. नेर, जि. यवतमाळ)असे आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये विशेष सत्र न्यायालयाने  त्याला मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कमाल १० वर्षे सश्रम कारावास व ११ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

* समोहन तज्ञाकडे गेलेल्या महिलेचा विनयभंग

नाशिक : चिडचिड होत असल्याने समोहन तज्ञाकडे गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

संशयीत तज्ञास इसमास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिपक विजयकुमार मुठाळ (४८ रा.प्रतापसिंग चौक पाथरवट लेन) असे अटक केलेल्या संशयीत तज्ञाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटीतील पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिलेची नाहक होत होती त्यामुळे तिने समोहन तज्ञांकडे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या बुधवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास महिला नागचौक परिसरातील संशयीताच्या समोहन केंद्रात गेली असता ही घटना घडली. उपचाराचा बहाणा करीत संशयीत मुठाळ याने महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Sexual #intercourse #minor #girl #rape #HighCourt, #अल्पवयीन #मुलीशी #संमती #शरीरसंबंध #बलात्कार #हायकोर्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुश्रीफ कुटुंबाकडून 127 कोटींचा घोटाळ्याचा किरीट सोमय्यांचा आरोप; मुश्रीफ 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार
Next Article जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?