नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आज भारताने जगभरात विक्रम केला आहे. म्हणजे आतापर्यंत 2 कोटी कोरोना लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, हे जगभरातील कुठल्याही देशाला शक्य झाले नाही. अजून आज रात्रीपर्यंत हा आकडा वाढला आहे. आणखी अचूक संख्या मिळू शकली नाही. आज प्रत्येक सेकंदांत 527 कोरोना लस देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी आज एकाच दिवसात देशात दोन कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. दुपारी 2 पर्यंत एक कोटी 20 लाखांहून अधिक लसीचे डोस घेतले गेल्याचे वृत्त आहे.
भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एक कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आले आहे.
लसीकरण मोहीमेत आज नवा रेकॉर्ड बनवला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अगोदर 27 ऑगस्टला 1.03 कोटी नागरिकांना डोस देण्यात आले. 31 ऑगस्टला 1.33 कोटी नागरिकांना डोस देण्यात आला. 6 सप्टेंबर 1.13 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आज 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दोन कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी दिली आहे.
बिहार लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहे, जिथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकांना लसीचे 16 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक आहे, जिथे 15 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.
* बर्थडे स्पेशल- Bhakt Anthem रॅप साँग
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजपचे नेते तेजींदर पाल सिंग बग्गा यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारं एक गाणं तयार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. भक्त अँथम म्हणजेच मोदी भक्तांचे गीत या नावाने हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं एक रॅप साँग प्रकारातील आहे.