Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मृताच्या बोगस सह्या ठोकून जमीन लाटली, मोहोळमध्ये तब्बल १३ जणांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मृताच्या बोगस सह्या ठोकून जमीन लाटली, मोहोळमध्ये तब्बल १३ जणांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2021/09/18 at 9:50 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ : आईला मिळालेल्या जमिनीवरती वारसाहक्काने एकुलत्या एक मुलाची नोंद असताना त्याच्या चुलत भावाने गावकामगार तलाठी मंडळ अधिकारी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांना हाताशी धरून मयताचे बोगस फोटो, खोट्या सह्या करून त्या जमिनी या इतरांची नोंद लावल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मोठ मोठ्या पदावर असलेल्या तब्बल १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने मोहोळमध्ये खळबळ माजली आहे.

या प्रकरणी १३ जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील ढोक बाभळगाव येथे घडली. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास मनोहर बेले राव यांची आजी ब अफ्रुका लक्ष्मण बेलेराव हिला शासनाकडून जमीन मिळाली होती. अफ्रुका बेलेराव याच्या मृत्यूनंतर सदर जमिनीवरती अफ्रुका यांचा नातू देवीदास मनोहर बेलेराव यांचे नाव लागले होते, असे असताना देविदास बेले राव यांचे चुलत भाऊ विकास बेलेराव याने १ जुलै २०२१ रोजी त्या जमीनी वर आम्हा भावांची नावे लावावीत म्हणून अर्ज केला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्या अर्जानुसार ढोक बाभळगावच्या तलाठ्याने बोगस नोटिसा काढल्या तसेच फिर्यादीची आज्जी अफ्रुका ही सोलापूर येथे मयत झाली असताना ती ढोकबाभळ गाव येथे मयत झाल्याचा खोटा दाखला ग्रामसेवकाकडून घेतला. याबरोबरच बाभळगावचे सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल यांना हाताशी धरून खोट्या सह्या व बोगस दाखले घेवून त्या जमिनी वरती फिर्यादी एकटा वारस असता ना इतर सातजणांची नावे वारसदार म्हणून नोंद केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी देविदास बेलेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ढोक बाभळगावचा कामती विभागाचा मंडल अधिकारी सुनिल केरबा बेलभंडारे, ढोक बाभळगावचा तलाठी सिद्धेश्वर हरीविजय नकाते, ग्राम सेवक मिलिंद कृष्णाजी तांबीले, महिला सरपंच रुक्मिणी राजाराम पांढरे, कोतवाल राजेंद्र जालिंदर कुंभार यांच्या सह माजी सरपंच बंडू शंकर मुळे, विकास गंगाराम बेलेराव, तानाजी दशरथ बेलेराव, सरूबाई शिवाजी बेलेराव, रुक्मिणी सतीश माने, जनाबाई गगाराम बेलेराव , जनार्धन गंगाराम बेलेराव , संगीता शिवाजी सुरवशे या १३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर खर्गे हे करित आहेत

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Land #looted #bogus #signatures #deceased #13people #Mohol, #मृताच्या #बोगस #सह्या #ठोकून #जमीन #लाटली #मोहोळ #१३जणांवर #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांना उच्च उत्पादन क्षमतेच्या ज्वारी बियाणाचे वाटप, कृषी राज्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Next Article क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, आजपासून पुन्हा आयपीएलचा रोमांच

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?