Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, आजपासून पुन्हा आयपीएलचा रोमांच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, आजपासून पुन्हा आयपीएलचा रोमांच

Surajya Digital
Last updated: 2021/09/19 at 11:29 AM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम आजपासून सुरू होत आहे. युएईमध्ये सर्व सामने खेळले जाणार आहेत. आयपीएल क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा ते करत होते, त्याला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दुबईत संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर हा सामना तुम्ही पाहू शकता.

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून सुरू होत आहे. युएईत ही स्पर्धा खेळली जाणार आहे. यासाठी सारे संघ युएईत दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना आज खेळला जाणार आहे.

पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान आजचा सामना रंगणार आहे. आयपीएल 2021 च्या या टप्प्याचा विजयी आरंभ करण्यास मुंबई इच्छुक आहे.  मागील टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे तर हैदराबाद तळाला आहे.  4 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये आज, 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीनं शानदार प्रदर्शन केलं आहे. दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये टॉप वर आहे. दिल्लीनं आतापर्यंत आठपैकी सहा सामने जिंकले आहेत.

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. चेन्नई 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सात सामने खेळणार आहे. विराट कोहलीच्या बंगळुरुनं आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत. 10  अंकांसह बंगळुरु तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीनं आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान उद्याचा सामना रंगणार आहे.  मुंबईनं आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकले आहेत. 8 अंकांसह मुंबई चौथ्या स्थानावर आहे. आता यंदाचा आयपीएल जिंकत मुंबई विजयी हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील सातपैकी चार सामने जिंकणं आवश्यक आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या  राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. राजस्थाननं पहिल्य़ा टप्प्यात आपल्या सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.

केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाब पॉइंट टेबलमध्ये सहाव्या नंबरवर आहे.  पहिल्या टप्प्यात पंजाबनं आठ पैकी तीन सामने जिंकले आहेत. पंजाबला प्ले ऑफमध्ये जायचं असेल तर उर्वरित सहापैकी  पाच सामने जिंकावे लागणार आहेत.

कोलकाताचा संघ आयपीएल 2021 चांगली राहिलेली नाही. कोलकाता टीम पॉईंट टेबलमध्ये सातव्या नंबर वर आहे.   केकेआरनं पहिल्या टप्प्यातील सात सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. हैदराबादनं आयपीएल 2021 मध्ये पहिल्या टप्प्यात खूपच निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. हैदराबाद आतापर्यंत पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. हैदराबादनं सात सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे.

* हंगामाचे वेळापत्रक (वेळ – भारतीय प्रमाणवेळेनुसार)

साखळी फेरी
१९ सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२० सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध बेंगलोर, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
२१ सप्टेंबर – पंजाब विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२२ सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२३ सप्टेंबर – मुंबई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
२४ सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
२५ सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध राजस्थान, अबुधाबी, दु. ३.३० वाजता
२५ सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध पंजाब, शारजा, संध्या. ७.३० वाजता
२६ सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, दु. ३.३० वाजता
२६ सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२७ सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२८ सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. ३.३० वाजता
२८ सप्टेंबर – मुंबई विरुद्ध पंजाब, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
२९ सप्टेंबर – राजस्थान विरुद्ध बेंगलोर, दुबई, संध्या.७.३० वाजता
३० सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
१ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध पंजाब, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२ ऑक्टोबर – मुंबई विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. ३.३० वाजता
२ ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध चेन्नई, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
३ ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध पंजाब, शारजाह, दु. ३.३० वाजता
३ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. ७.३० वाजता
४ ऑक्टोबर – दिल्ली विरुद्ध चेन्नई, दुबई, संध्या. ७.३० वाजता
५ ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध मुंबई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
६ ऑक्टोबर – बेंगलोरविरुद्ध हैदराबाद, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
७ ऑक्टोबर – चेन्नई विरुद्ध पंजाब, दुबई, दु. ३.३० वाजता
७ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध राजस्थान, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
८ ऑक्टोबर – हैदराबाद विरुद्ध मुंबई, अबुधाबी, दु. ३.३० वाजता
८ ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध दिल्ली, दुबई, संध्या. ७.३० वाजता

* प्लेऑफ सामने

१० ऑक्टोबर – क्वालिफायर १, दुबई, संध्या. ७.३० वाजता
११ ऑक्टोबर – एलिमिनेटर, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
१३ ऑक्टोबर – क्वालिफायर २, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
१५ ऑक्टोबर – अंतिम सामना, दुबई, संध्या. ७.३० वाजता

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मृताच्या बोगस सह्या ठोकून जमीन लाटली, मोहोळमध्ये तब्बल १३ जणांवर गुन्हा
Next Article शिल्पाने घेतला घटस्फोटाचा निर्णय? सोशल मीडियावरील पोस्टवरून चर्चा बळीचा बकरा बनवलं जात आहे – कुंद्रा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?