चंदीगड : काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात येणार आहे. त्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट करून ही माहिती दिली. काही काळापूर्वीपर्यंत सुखजिंदरसिंग रंधावा यांचे नाव पुढे जात होते, परंतु शेवटच्या प्रसंगी चन्नीच्या नावाची घोषणा करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच संध्याकाळी साडे सहा वाजता चेन्नी हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन्याचा दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना आपण आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं. आपली विधिमंडळ पक्ष नेतेपदी एकमाताने निवड झाली आहे. आपली भूमिक राज्यपालांकडे माडंत सरकारच्या स्थापनेचा दावा, असं चन्नी यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितलं. तसंच उद्या सकाळी ११ वाजता आपला शपधविधी होणार आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांचे अभिनंदन केले आहे. पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करूया. जनतेचा विश्वास सर्वोच्च आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
राजकारण हे बेरजेवरच चालतं असं नाही. तर मनी पॉवर, उच्च शिक्षण आणि समाजात असलेली प्रतिष्ठा यामुळे पारंपरिकरित्या सत्ताधारी वर्ग हा मोठ्या पदांवर कायम राहिला, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पंजाबमध्ये राजकीय आरक्षणही फारसं उपयोग ठरलेलं नाही. ११७ जागांच्या विधानसभेत ३४ जागा आरक्षित आहेत. पण दलित समाजातून येणाऱ्या नेत्यांना कुठल्याही सरकारमध्ये मंत्रिपदाची सूत्र दिली गेली नाहीत, असे तज्ञाकडून बोलले जात आहे.
दलितांकडे अजूनही मतपेटी म्हणून बघितलं जातं. त्यांना सामाजिक आणि आर्थिकरित्या बळकट केलं जात नाही. दलित मोठ्या संख्येत वर आले तर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांसमोर नक्कीच आव्हान निर्माण करतील, यात शंका नसल्याचं ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये जोरदार राजकारण रंगलं होतं. आता मुख्यमंत्रीपदी काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करत पंजाबमधील हायहोल्टेज ड्रामा संपला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावं चर्चेत होती. नवज्योत सिंग सिद्धू, सुखजिंदर सिंग रंधवा आणि माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांची नावं आघाडीवर होती. आज रविवारी संध्याकाळी काँग्रेसने चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.
* चरणजीत सिंग यांची ओळख
चरणजीत सिंग चन्नी हे ४८ वर्षांचे आहेत. चामकौर साहिब मतदारसंघाचे ते आमदार आहेत. ते दलित समाजातून येतात. आतापर्यंत ते तीन वेळा आमदार झाले आहेत.
चन्नी हे नवज्योत सिंग सिद्धू यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांनीही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड केलं होतं.
मुख्यमंत्रीपदासाठी अखेरच्या क्षणी चन्नी यांच्या नावाची घोषणा झाल्याने सर्वांच धक्का बसला. कारण शेवटपर्यंत सुखजिंदर सिंग रंधवा यांचं नाव चर्चेत होतं. सिद्धू यांच्या गटाकडून रंधवा यांच्या नावाला समर्थन न मिळाल्यानं शेवटच्या क्षणी नाव बदलण्यात आलं.
पंजाबमध्ये जाट समाज हा बहुसंख्य आहे. पण दुसरीकडे दलितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण इतक्या जाट नेत्याव्यतिरिक्त इतक्या मोठ्या पदावर पंजाबमध्ये दलित नेत्याची निवड झाली आहे.
* १५ मुख्यमंत्र्यांमध्ये एकही दलित नव्हता
२०११ च्या जनगणनेनुसार पंजाबच्या एकूण लोकसंख्येपैकी ३२ टक्के लोकसंख्या ही दलितांची आहे. पंजाबमध्ये जवळपास ३ कोटी दलित आहेत. ही लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १ तृतियांश इतकी आहे. यावरून पंजाबमध्ये दलितांची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर असल्याचं दिसून येतं.
स्वातंत्र्यानंतर पंजाबमध्ये आतापर्यंत १५ मुख्यमंत्री झाले. पण यापैकी एकही दलित नव्हता. १५ पैकी ३ मुख्यमंत्री हिंदू होते. ग्यानी झैलसिंग वगळता बाकीचे सर्वच मुख्यमंत्री जाट शीख होते. ग्यानी झैलसिंग हे रामगढीया समाजातून येतात. हा समाज पंजाबमधील ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांमध्ये येतो.