Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीत रविवारी मोफत सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान प्रशिक्षण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

बार्शीत रविवारी मोफत सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान प्रशिक्षण

Surajya Digital
Last updated: 2021/09/21 at 6:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी :  येथील मधुबन फार्म व नर्सरी आणि लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 26 सप्टेंबर 2021 रोजी बार्शी येथे मोफत  सीताफळ ऊत्पादन व तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

बार्शी-परंडा रस्त्यावरील बायपास चौकात सीताफळ किंग डॉ. नवनाथ कसपटे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या मधुबन फार्म  नर्सरीच्या परिक्षेत्रात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत भव्य शेतकरी मेळावा आणि सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान या विषयावर चर्चासत्र होणार आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे या मेळाव्यात ऍनलाईन सहभागी होणार असून, विद्यापीठाचे कृषी विस्तार, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. संजय पांडुरंग पांढरे हे या चर्चासत्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी डॉ. नवनाथ कसपटे कीड-रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात 42 सीताफळ वाणांची प्रक्षेत्रावरील लागवड तसेच सीताफळ पीक उत्पादनाची विविध प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत.

तसेच चर्चासत्रात सीताफळ लागवडीसंदर्भात पूर्वमशागत व पूर्व नियोजन, योग्य जातीची निवड, रोपांची योग्य लागवड पद्धत, कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन, सीताफळ विक्री व्यवस्थापन या विषयांवर उपस्थित सीताफळ उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मेळावा व चर्चासत्रासाठी कसलीही फी आकारण्यात आलेली नसून, यावेळी सोशल डिस्टंन्सींग व मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.

यासाठी मर्यादीत जागा असल्याने आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. आगावू नोंदणीसाठी 9923137757 किंवा 9881426974 या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन रवींद्र कसपटे व प्रविण कसपटे यांनी केले आहे.  मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Free #Custard #Production #Technology #Training #Barshi, #बार्शीत #रविवारी #मोफत #सीताफळ #उत्पादन #तंत्रज्ञान #प्रशिक्षण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अफगाणमधून आणलेले टेल्कम पावडरच्या कंटेनर्समध्ये 21,000 कोटींचे ड्रग्स जप्त
Next Article विरुद्ध बाजूस येवून ट्रकची कारला धडक; एक ठार, दोन जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?