चंद्रपूर : राज्यात अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद आहे. याचा मोठा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती असून राज्य अंधारात जाण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, तीन दिवसापेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत.
ज्यात अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद आहे. याचा मोठा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती असून राज्य अंधारात जाण्याची शक्यता अधिक आहे. अपुऱ्या कोळसा पुरवठ्याअभावी राज्यातील औष्णिक वीज केंद्रापैकी काही संच बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. अतिवृष्टी व पावसाचे दिवस ओसरताच कोळसा उत्पादनात वाढ होत स्थिती पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम हा विद्युत निर्मितीवर झाला आहे. राज्यात वीज निर्मिती झाली नाही तर राज्यात अंधार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. कोळशाअभावी औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद असून राज्यातील वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने महत्वाच्या चार युनिटचे उत्पादन बंद पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक 6 सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद पडू शकते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आधीच वीज निर्मितीची स्थिती बिकट असताना त्यात अपुऱ्या कोळसा पुरवठ्याची भर पडली आहे. अपुऱ्या कोळसा पुरवठ्याअभावी राज्यातील औष्णिक वीज केंद्रापैकी काही युनिट बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. अतिवृष्टी व पावसाचे दिवस ओसरताच कोळसा उत्पादनात वाढ होत स्थिती पूर्ववत होण्याचा अंदाज आहे.
कोळशाचा साठा संपत आला आहे. याचा प्रभाव, परिणाम वीज निर्मितीवर होत आहे. त्यातच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कोळसा उत्पादनात अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे कोळशाचा साठा करता आलेला नाही. तसेच कोळसा वाहतुकीतही समस्या येत आहेत. त्यामुळे कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम हा विद्युत निर्मितीवर झाला आहे. राज्यात वीज निर्मिती झाली नाही तर राज्यात अंधार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
आधीच वीजेची थकबाकी होत नसल्याने ऊर्जा खाते तोट्यात आले आहे. ऊर्जामंत्री विजबिल भरण्यासाठी विनंती करीत आहेत. अशात आता ही कोळश्याची अडचण निर्माण झाली आहे.