Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लष्कराला मिळणार अत्याधुनिक ‘अर्जुन एमके- १ ए’ रणगाडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

लष्कराला मिळणार अत्याधुनिक ‘अर्जुन एमके- १ ए’ रणगाडे

Surajya Digital
Last updated: 2021/09/25 at 9:43 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. लष्कराला ‘अर्जुन एमके-१ ए’ हे रणगाडे मिळणार आहेत. संरक्षण दलाने ११८ ‘अर्जुन एमके – १ ए’ रणगाड्यांची ऑर्डर चेन्नई स्थित आयुध निर्माण कारखान्याच्या हेवी व्हेहिकल फॅक्टरीला दिली आहे. या सर्व रणगाड्यांची ७ हजार ५२३ कोटी रुपये इतकी आहे. डीआरडीओने हा स्वदेशी बनावटीचा रणगाडा विकसित केला आहे. लष्कराने आणखी पूर्णपणे अर्जुनसारख्या स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यांवर विश्वास दाखवलेला नसल्याचे वृत्त आहे.

भारताच्या लष्कराला स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती मिळणार आहे. संरक्षण दलाने ११८ ‘अर्जुन एमके-१ ए’ रणगाड्यांची ऑर्डर चेन्नई स्थित आयुध निर्माण कारखान्याच्या ‘हेवी व्हेहिकल फॅक्टरी’ला दिली आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत संरक्षण दलात अत्याधुनिक अर्जुन एमके -१ ए रणगाडे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ११८ रणगाड्यांची किंमत ही ७ हजार ५२३ कोटी रुपये आहे.

बदलत्या काळानुसार आणि संरक्षण दलाची नवी गरज लक्षात घेऊन अर्जुन रणगाड्यामध्ये आणखी बदल संरक्षण दलाने सुचवले होते. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने बऱ्याच वर्षांच्या संशोधनानंतर स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा विकसित केला होता. मात्र संरक्षण दलाने यात अनेक बदल सुचवले. २०१२ पर्यंत एकूण १२४ अर्जुन रणगाडे हे लष्करात दाखल झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अर्जुन एमके- १ रणगाड्यात आणखी ७२ बदल करत अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती ‘अर्जुन एमके-१ ए’ ही डीआरडीओने विकसित केली. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान यांच्या हस्ते पहिला अर्जुन एमके-१ ए रणगाडा लष्कराकडे दिला होता. लष्कराने विविध ठिकाणी सखोल चाचण्यानंतर अर्जुन एमके -१ ए रणगाड्याला स्वीकारले आणि ११८ रणगाड्यांची ऑर्डर दिली.

अर्जुन एमके-१ ए रणगाड्याचे वजन तब्बल ६८ टन एवढे आहे. जगातील सर्वात वजनदार रणगाडा म्हणून अर्जुन एमके-१ ए रणगाडा ओळखला जात आहे. भारतातील सर्व प्रकारच्या प्रदेशात जास्तीत जास्त ५८ किलोमीटर प्रति तास या वेगाने संचार करण्याची क्षमता या रणगाड्याने सिद्ध केली आहे. १२० मिलीमीटर तोफेतून वेगाने तोफगोळे डागण्याची या रणगाड्याची क्षमता उच्च प्रतिची आहे. दिवस असो वा रात्र किंवा कोणताही ऋ्तु, कोणत्याही परिस्थितीत रणभूमीवर टिकाव धरु शकेल, अशी या रणगाड्याची अचाट अशी क्षमता असल्याचे डीआरडीओने सांगितले आहे.

११८ रणगाड्यांच्या निर्मितीमुळे उद्योग क्षेत्रात ८००० जणांना रोजगार मिळेल असा विश्वास डीआरडीओने व्यक्त केला आहे. अर्जुन एमके-१ ए रणगाड्याचा समावेश जरी होणार असला तरी ही संख्या लष्कराकडे असलेल्या एकूण रणगाड्यांच्या संख्येच्या तुलनेत नगण्य अशी आहे. लष्कराने अजुनही पुर्णपणे अर्जुनसारख्या स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यांवर विश्वास दाखवलेला नाही. लष्कराची भिस्त आजही रशियाचे तंत्रज्ञान असलेल्या टी – ९० सारख्या रणगाड्यांवर आहे. तेव्हा येत्या काळांत स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेले आणखी अत्याधुनिक रणगाडे डीआरडीओ कधीपर्यंत विकसित करतात हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Army #stateart #ArjunMK1A #tanks, #लष्कराला #अत्याधुनिक #अर्जुनएमकेए #रणगाडे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘ड्राय डे’ ला बिअर विकल्याप्रकरणी गोविंद बिअर शॉपीविरोधात गुन्हा दाखल
Next Article चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा तर मेळघाटात 10 जणांना अन्नातून विषबाधा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?