बंगळुरु : कर्नाटकच्या कोलारमध्ये 20 माकडांना विष देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माकडांना विष देऊन संपवण्यात आलं. त्यानंतर त्यांचे मृतदेह गोण्यांमध्ये भरून ते फेकून देण्यात आले. हा प्रकार समोर 20 येताच परिसरात खळबळ माजली आहे. 30 माकडं एका गावात मृतावस्थेत आढळून आली होती. तर जवळपास 20 माकडं जखमी अवस्थेत सापडली होती.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माकडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोषींचा शोध सुरू असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. असाच प्रकार जुलैमध्ये हस्सन जिल्ह्यात घडला होता. त्यावेळी 30 माकडं एका गावात मृतावस्थेत आढळून आली होती. तर जवळपास 20 माकडं जखमी अवस्थेत सापडली होती. असा प्रकार दोनदा झाल्याने खळबळ माजली आहे. याचा तपास लावून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
कर्नाटकच्या हस्सन जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे, या धक्कादायक घटनेनंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, माकडांना विष देऊन ,एका गोणीत भरण्यात आले मारहाण करुन त्यांना काही चोरट्यांनी चोपनाहल्लीजवळ रस्त्याच्या कडेला फेकले. या कृत्यात जखमी झालेल्या 20 माकडांना त्वरित तिथल्या ग्रामस्थांनी पाणी पाजवले. ग्रामस्थांना रस्त्याच्या कडेला पोत्यात नेमके काय आहे हे पाहावे वाटले आणि ते पोते उघडल्यावर त्यांना हे दृश्य बघून धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
गावातील लोकांपैकी काहींनी सांगितले की पोत्यात भरल्यानंतर माकडांवर हल्ला केला असावा. त्यांच्या मधील जे जिवंत होते ते श्वास घेण्याच्या तयारीत होते आणि ते हालूही शकले नाहीत. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून त्यांनी मृत माकडांना पुरण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. प्राथमिक अहवालात माकडांना विषबाधा झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
बेलूर तालुक्यात असलेल्या चोवडानहल्ली गावात हा प्रकार घडला होता. माकडांना आधी विष देण्यात आलं आणि मग त्यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती तपासातून समोर आली. माकडांना मारणाऱ्यांनी त्यांना गोणींमध्ये भरलं आणि त्या चोवडानहल्ली गावाजवळ रस्त्याच्या शेजारी टाकल्या. या गोणी स्थानिक तरुणांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तरुणांनी गोणी उघडून पाहिल्या. त्यावेळी काही माकडं श्वास घेताना तडफडत असल्याचं त्यांना दिसलं. मात्र मारहाण झाल्यानं त्यांना हालचालही करता येत नव्हती.