सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. बँकेतील भ्रष्टाचाराबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून या बाबत चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आली. तसेच, किरीट सोमय्या यांनी बँकेला भेट देण्याची मागणी करणार असल्याचे तक्रारदार, स्वतंत्र भारत पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी म्हटले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याबाबत भ्रष्टाचाराबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून या बाबत चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिलीय. मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याबाबत सांगलीला भेट देण्याची मागणी किरीट सोमय्यांना करणार असल्याचा फराटे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाखल करण्यात आलेली तक्रार आणि बँकेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत असणारे पुरावे घेऊन आपण भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.
एका बाजूला राज्य सरकारकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीला स्थगिती दिली आहे, मात्र सुनील फराटे यांनी थेट पंतप्रधानांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर केंद्र सरकार आता यामध्ये काय भूमिका घेणार ,याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र थेट पंतप्रधानांच्याकडे धाव घेतल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या तक्रारी बाबत नुकतेचे राज्य सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले होते.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक व शिराळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, चौकशी सुरू असताना सहकार विभागाकडून अचानक या चौकशीला स्थगिती देण्यात आली. मात्र राजकीय दबावातून या चौकशीचे फार्स करण्यात आला आणि पुन्हा त्याला स्थगिती देण्यात आली, असा आरोपही सुनील फाराटे यांनी केला.
सुनील फराटे यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेवून सुनील फराटे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून ही तातडीने घेण्यात आली आहे. संबंधित तक्रारीच्या चौकशीसाठी एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही तक्रारदार सुनील फराटे यांनी दिली आहे.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना व्याजात एक टक्का सवलत देण्याचा तसेच जिल्ह्यातील सर्व विकास सोसायट्यांना 12 टक्के लाभांश देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वसंतदादा सभागृहात अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत काल पार पडली.
यावेळी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार मोहनराव कदम, सी. बी. पाटील, प्रतापराव पाटील, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, स्वीकृत संचालक किरण लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील, सरव्यवस्थापक एम. बी. रामदुर्ग उपस्थित होते.