विरवडे बु : कुरुल (ता. मोहोळ) येथील वाडीचा ओढा रस्त्यावरील महावितरणची मेन तार तुटून आठ ते दहा दिवस झाले व शेतकऱ्यांनी वारंवार सांगून सुद्धा दुरुस्त न केल्याने व पूर्वकल्पना न देता विद्युत पुरवठा बंद केली असून बेसुमार आकारलेला दंड रद्द करण्यासाठी कुरूल (ता.मोहोळ) येथील एसटी स्टँड चौकात जनहित शेतकरी संघटनाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी केले.कुरूल (ता. मोहोळ) येथील वाडीचाओढा, जाधव रस्त्यावरील कॅनलच्या जवळील मेन लाईनमधील तार तुटून आठ ते दहा दिवस झाले. अद्याप कुरुल सब स्टेशनच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी वारंवार हेलपाटे मारून सुद्धा तसेच वरिष्ठ अधिकारी हेमंत तापकिरे यांनी सांगून सुद्धा तार न जोडल्यामुळे फळांचे बागांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याचे हाल झाले. यामुळे अशा बेजबाबदार व कामात चुकारपणा करणाऱ्या रहिमान आतार यांची चौकशी करून झालेले नुकसान भरपाई त्यांच्या पगारातून घेऊन त्यांना त्वरित निलंबित करावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.
कुरुल येथील पंचवीस महावितरणच्या ग्राहकांना तुम्ही शेजारच्यांना लाईट का देता म्हणून पूर्वकल्पना न देता डायरेक्ट दंड आकारून असल्या कोरोनासारख्या भयानक काळात तसेच भयानक आर्थिक संकटात असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बेसुमार दंड आकारला आहे. तो त्वरित रद्द करण्यासाठी व त्यांना नवीन कनेक्शन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महावितरणचे वरिष्ठ अधिकारी हेमंत तापकिरे यांनी संबंधित अधिकारी रहिमान आतार यांना सांगून सुद्धा व वारंवार शेतकऱ्यांनी हेलपाटे घालून विनंती करून काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या पिकाच्या व मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल झाले आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी व तुटलेली मेन लाईन जोडून द्यावी तसेच २० ते २५ महावितरणच्या ग्राहकांना बेसुमार दंड आकारला आहे तो त्वरित रद्द करा, दीड वर्षापासून आर्थिक संकटात असणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांना वरिष्ठ अधिकारी यांनी माणुसकीचा धर्म पाळून त्यांना सहकार्य करावे, अशी यावेळी मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे सदस्य अण्णासाहेब पाटील, लीसूराम उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष लिंगदेव निकम, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, नाना मोरे, सागर सलगर, शिवाजी जाधव,राजाराम साळुंखे, प्रकाश जाधव, तुकाराम शिंदे, गुरुलिंग पाटील, आकाश सोनवणे, गणेश जाधव, नितीन मस्के आदी उपस्थित होते.
” ११ ग्राहकांवर दंडात्मक कारवाई झालेले आहे अशा ग्राहकांना विद्युत निरीक्षक सोलापूर व उपविभाग मोहोळ यांच्याकडे सामूहिक अपील केले आहे त्यांच्यावर विचार करून त्यांच्या वरील दंड कमी करू”
– रहिमान आतार, उपअभियंता,
महावितरण कुरुल