सोलापूर : विजापूर नाका पोलीस कोठडीतून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या भीमाशा रज्जा काळे (भांबुरे पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा) याचा उपचारादरम्यान काल रविवारी मृत्यु झाला. हा मृत्यु पोलीसांच्या मारहाणीत झाला आहे असा आरोप पारधी समाजातील युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून केला.
आज सोमवारी सकाळपासून पोलीसांकडून विजापूर नाका जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर आणि उस्मानाबाद येथून भिमशा काळे यांचे नातेवाईक जमा झाले. तो पारधी आहे आणि तो गुन्हेगारच आहे असं समजून पोलीसांनी काळे याला बेदम मारहाण केली, असा आरोप भिमशा यांच्या पत्नीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला.
न्यायालयाने त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. मात्र, 24 सप्टेंबरलाच त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला (Civil Hospital) हलविण्यात आले. काल रविवारी (ता. 3) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला. आता या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीमार्फत (CID) केला जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मला 7 मुलं आहेत, पती गेला आता सारेजण रस्त्यावर आलो आहोत न्याय द्या, अशी ती मागणी करत होती. भिमशा काळे यांच्या चोरीचे विविध गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल झाले. संशयावरुन त्यांना कुर्डुवाडी पोलीसांकडून विजापूर नाका पोलीसांनी काही दिवसापूर्वी ताब्यात घेतलं. तपास करताना त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता असे काळे यांच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे यांचे दोनशेवर स्त्री-पुरुष नातेवाईक आणि सहकारी जमले होते. याठिकाणी प्रशासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलनही करण्यात आलं. जिल्हाधिकारी आल्यानंतर या हे सर्वजण त्यांच्या कक्षात आले. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. परंतु, 24 तारखेलाच त्याला त्रास होऊ लागला. त्याच्या किडनीवर डायलेसिसचे उपचार सुरू होते. मानसिकदृष्ट्या तो आजारी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी हलविले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून त्याला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचेही विजापूर नाका पोलिसांनी सांगितले.
“घरफोडीत काहीही संबंध नसताना पोलिसांनी संशय घेऊन माझ्या पतीला अटक केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणल्यानंतर ते नैसर्गिक विधीसाठी जाताना त्यांच्या पायातून रक्त पडत होते”
– मयताची पत्नी