Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेत्री कंगना रानावतची थेट आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती; वडिलांना सवाल विचारण्याचा सल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

अभिनेत्री कंगना रानावतची थेट आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती; वडिलांना सवाल विचारण्याचा सल्ला

Surajya Digital
Last updated: 2020/08/05 at 4:35 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोपांची मालिका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर येऊन ठेपली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी गलिच्छ राजकारण होत असून मी संयम ठेवल्याचा इशारा दिला आहे. आता अभिनेत्री कंगना रानावतने थेट आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

यानंतर कंगनाच्या टीमने आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावताना या प्रश्नांचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीय, यामुळे कृपया याचे उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अभिनेञी कंगना रानावत च्या डिजिटल टीमने पहिल्याच ट्विटमध्ये लिहिले आहे, ”हाहा, पहा गलिच्छ राजकारणावर कोण बोलत आहे. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची खूर्ची कशी मिळाली, हे देखिल गलिच्छ राजकारणावरील केस स्टडी आहे सर. हे सारे सोडा, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री वडिलांना सुशांतच्या मृत्यूविषयी हे प्रश्न विचारा. पहिला प्रश्न- रिया चक्रवर्ती कुठे आहे?”

दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूबाबत एफआयआर दाखल का नाही केला? तिसरा प्रश्न – जेव्हा सुशांतच्या जिवाला धोका असल्याची फेब्रुवारीतच एक तक्रार दाखल झालेली होती, मग मुंबई पोलिसांनी एका दिवसात सुशांतने आत्महत्या केल्याचे घोषित करण्याची घाई का केली? असे प्रश्न विचारले आहेत.

तिसऱ्या ट्विटमध्ये कंगनाच्या टीमने चौथा प्रश्न विचारला आहे. आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा सुशांतच्या मोबाईलची माहिती का नाहीय? ज्याद्वारे मृत्यूच्या एक आठवडा आधी सुशांतने कोणाकोणाला फोन केले होते? कोणाकोणाशी बोलला होता? पाचवा प्रश्न- बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर लॉक करून का ठेवले आहे? सहावा प्रश्न- अखेर तुम्ही सीबीआय चौकशीला का घाबरत आहात? आणि सातवा प्रश्न रिय़ा आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचे पैसे का लुटले?, असे प्रश्न विचारले आहेत.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #आदित्यठाकरे #कंगणारानावत #सवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार पडळकरांनी लाडू वाटून साजरा केला श्रीराम मंदिराचा आनंदोत्सव
Next Article बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे; केंद्राने विनंती स्वीकारली

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?