Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी हरीश बैजल यांची नियुक्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी हरीश बैजल यांची नियुक्ती

Surajya Digital
Last updated: 2021/10/08 at 10:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची नियुक्ती झाली. राज्याच्या गृह विभागाने आज सोलापूर व पुणे येथे वरिष्ठ पातळीवरील दोघा पोलिस अधिका-यांच्या बदल्या केला आहेत.

आज तसा आदेश निघाला आहे. नुकतेच सोलापूरला आल्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोलापूरला नवा आयुक्त लवकरच मिळेल, असे म्हटले होते. अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे तसेच पोलिस उप महानिरीक्षक हरिष बैजल या दोघा बड्या पोलिस अधिका-यांचा आजच्या झालेल्या बदल्यात समावेश आहे.

सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली, सोलापूर शहरचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची ऑगस्ट महिन्यात पोलिस आयुक्त (सोलापूर शहर) म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. तसेच कराळे यांनी सोलापुरात येण्यास टाळाटाळ करीत नापसंती दाखवली. त्यामुळे अंकुश शिंदे यांना काही दिवस सोलापुरात थांबावे लागले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल यांची सायबर व म.अ.प्र., महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून सोलापूर शहर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे असलेली आदेशाधीन बदली रद्द करण्यात आली असून त्यांची नियुक्ती पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत झाली आहे.

दरम्यानच्या काळात राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर हा विषय काढला असता त्यांनी येणाऱ्या पंधरा दिवसात नव्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईल, अशी माहिती दिली. त्यानुसार आज शुक्रवार, 8 ऑक्टोबर रोजी सोलापूरसाठी नवे पोलिस आयुक्त म्हणून हरीश बैजल यांची नियुक्ती झाली आहे. ते आता केव्हा पदभार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Appointment #HarishBaijal #new #Commissioner #Police #Solapur, #सोलापूर #नव्यापोलीस #आयुक्तपदी #हरीशबैजल #नियुक्ती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोटमध्ये मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील शेतकरी ठार
Next Article असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, श्रीमंतांचं टॉयलेट

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?