Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वीज पडून मोहोळमध्ये शेतकऱ्यांचा, म्हशीचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वीज पडून मोहोळमध्ये शेतकऱ्यांचा, म्हशीचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना

Surajya Digital
Last updated: 2021/10/09 at 9:07 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ : शेतामध्ये नांगरट करत असताना विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला आणि अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी  घटना तांबोळे शिवारात घडली.

बाळू गोविंद सरवदे ( ५१, रा नजीक ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांबोळे शिवारात गट नंबर ७८ / ३ या ठिकाणी शेतामध्ये बाळू गोविंद सरवदे व प्रकाश गोविंद सरवदे हे दोघे बैलजोडी सह नांगरट करत होते. अचानक पावसाला सुरुवात झाली बारीक पाऊस सुरू झाल्याने गडबडीमध्ये गवत गोळा करू लागले. त्यामुळे त्यावेळी विजेचा मोठा कडकडाट झाला.

शेतातील बैलजोडी नांगरासकट पळत सुटली व बाळू व प्रकाश दोघेही खाली पडलेले होते. त्याचे पुतणे त्यांना पडलेले पाहून पळत जावून त्यांना उठवू लागले. यावेळी प्रकाश सरवदे यांच्या डोळ्यांना अंधारी आली होती, तर बाळू गोविंद सरवदे ( वय ५१) हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना उचलून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केले.

कोन्हेरी (ता मोहोळ ) येथे धनाजी मुळे यांची म्हैस विज अंगावर पडल्याने मयत झाली. यापूर्वी सहा दिवसापूर्वी कोन्हेरी येथीलच प्रकाश बाबु तुपसमींदर या शेतकऱ्याची जर्सी गाई विज पडून मयत झाली होती.आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* नीट परिक्षेचा निकाल जाहीर करु नका, उच्च न्यायालयाचा आदेश

बार्शी : याचिकाकर्त्यांचा नीट परिक्षेचा निकाल पुढील तारखेपर्यंत जाहीर करु नये, असे आदेश उच्च न्यायालयाच्या व्दिसदस्यीय पीठाने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकातील विसंगतीप्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीप्रसंगी दिला.

यावेळी तक्रारबाधित परिक्षेच्या केंद्र संचालकाकडून प्रतिज्ञापत्राव्दारे प्राप्त होणार्‍या अहवालावर निर्णय घेवू, अशी हमी नीटच्यावतीने देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने येत्या सोमवारी दहा वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश केंद्र संचालकांना दिले. यावर ११ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. पूजा थोरात, ऍड. गजानन कुकडे, ऍड. एच.एस. शिंदे यांनी काम पाहिले. गेल्या 12 सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परिक्षेदरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या परिक्षा केंद्रातील दहा क्रमांकाच्या कक्षामध्ये सहा विद्यार्थ्यांना विसंगत कोडच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिल्या गेल्या होत्या.

याबाबत परिक्षार्थ्यांनी वेळीच पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांना त्यांच्याकडून झालेली चूक निदर्शनास आणून देवून देखील त्यांनी त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आपले शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील अभिषेक कापसे आणि  उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील वैष्णवी भोपले यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी न्यायमूर्ती आर.डी. धनुका आणि अभय आहुजा यांच्या व्दिसदस्यीय पीठासमोर झाली.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Farmers #buffaloes #die #Mohol #lightning #second #week, #वीज #मोहोळ #शेतकऱ्या #म्हशीचा #मृत्यू #घटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘चरसचे सेवन केले, आर्यनची कबुली’, सोमी अलीने केली धक्कादायक पोस्ट
Next Article ‘आर्यन खानला पकडले, भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडले’, नवाब मलिकांचा दावा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?