Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘आर्यन खानला पकडले, भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडले’, नवाब मलिकांचा दावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘आर्यन खानला पकडले, भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडले’, नवाब मलिकांचा दावा

Surajya Digital
Last updated: 2021/10/09 at 10:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : शाहरुख खानचा पुत्र आर्यन याच्यावर कारवाई केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक हे आज पुन्हा एकदा NCB वर तुटून पडले. जहाजावर 1500 जण उपस्थित होते. त्यात फक्त काहीच जणांना अटक केली. रिषभ सचदेवा, अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आल्याचा दावा नवाब मलिकांनी केला. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित कम्बोज यांचे मेहुणे असल्याचेही ते म्हणाले.

पत्रकार परिषद घेत मलिकांनी आज पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत.या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे एनसीपीला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारलं आहे. आम्ही मागणी करयोय की वानखेडे यांनी याचा तात्काळ खुलासा करावा, असं मलिक म्हणालेत

भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केलाय. क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. 12 तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. मात्र, अवघ्या तीन तासात वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना सोडून देण्यात आलं. यावेळी वृषभ सचदेवाचे वडील होते. अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केलीय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वृषभ सचदेवा हा भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष मोहित भारतीय याचा मेहुणा आहे. एनसीबीने ड्रग्स पार्टी प्रकरणात 1300 लोकांमधून 11 लोकांना पकडलं होतं. त्यातील 3 लोकांना सोडून देण्यात आलं. फक्त 8 लोकांना अटक दाखवली. वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना का सोडून देण्यात आलं? या प्रकरणाचा सर्व तपास हा कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅटवर अवलबून आहे. मग, या तिघांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅट का तपासले नाहीत? असा सवालही मलिक यांनी केलाय.

भाजप नेत्याच्या मेहुण्याला आणि इतर दोघांना सोडण्यासाठी राज्य आणि दिल्लीतील भाजप नेत्यांचा दबाव होता. हे सर्व प्रकरण फर्जी आहे. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम एनसीबीच्या माध्यमातून सुरु आहे. पंचनाम्यावेळी यांचे पंच आहेत, त्यांचा वेगवेगळे पत्ते देण्यात आले आहेत, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केलाय.

मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे माझी मागणी आहे, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांनी सीआरपीएफच्या ताब्यातील बोटीचं सीसीटीव्ही मागितलं पाहिजे. त्यातून अनेक खुलासे समोर येतील, असा दावा मलिक यांनी केलाय.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Arrested #AryanKhan #released #BJPleader's #sister-in-law #claims #NawabMalik, #आर्यनखान #भाजप #नेत्याच्या #मेहुण्याला #नवाबमलिक #दावा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वीज पडून मोहोळमध्ये शेतकऱ्यांचा, म्हशीचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना
Next Article ‘त्या’ क्रूझवर पार्थ पवारही होते का ? समीर वानखेडे म्हणाले…देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?