Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धक्कादायक! भारतीय अंपायरचं क्रिकेट मॅचमध्ये बॉल लागल्यानं निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

धक्कादायक! भारतीय अंपायरचं क्रिकेट मॅचमध्ये बॉल लागल्यानं निधन

Surajya Digital
Last updated: 2021/10/10 at 9:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील फिरोज शहा कोटला स्टेडियममधील एका सामन्यात बॉल लागल्याने अंपायरचा मृत्यू झाला आहे. सुमीत बन्सल असं त्यांचं नाव असून ते ४६ वर्षांचे होते. २ ऑक्टोबर रोजी बन्सल यांच्या चेहऱ्याला बॉल लागला होता. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांचे हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे.

बीसीसीआयचे मान्यताप्राप्त अंपायर असलेले सुमीत हे माजी आंतरराष्ट्रीय अंपायर एस.के. बन्सल यांचे पुत्र होते. २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये त्यांच्या चेहऱ्याला जोरात बॉल लागला होता. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांचे हृदयक्रिया बंद पडल्यानं निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे.

सुमीत बन्सल यांच्या निधनानंतर क्रिकेट मैदानातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा याचा बांगालादेशमध्ये क्रिकेट खेळताना बॉल लागल्यानं १९९८ साली मृत्यू झाला होता. तसंच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेस या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचही काही वर्षांपूर्वी बॉल लागल्यानं निधन झालं होतं.

* T20 World Cup: विजेत्या संघाला मिळणार एवढी रक्कम

टी २० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसीने विजेत्या आणि उप विजेत्या संघाला किती रुपयांचं बक्षीस मिळणार याची घोषणा केली. विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८ ,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. १० आणि ११ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ४,००,००० डॉलर्स म्हणजेत ३ कोटी रुपये मिळणार आहेत.

सुपर १२ मधील विजेत्या संघांना बोनस मिळणार आहे. सुपर १२ च्या प्रत्येक ३० सामन्यातील विजेत्या संघाला ४० हजार डॉलर्स म्हणजेच ३० लाख रुपये दिले जातील. तर या टप्प्यात नॉकआउट होणाऱ्या संघांना ७० हजार डॉलर्स म्हणजेच ५२.५९ लाख रुपये मिळतील. पात्रता साखळी फेरीतील प्रत्येक विजयाला ३० लाख रुपये मिळणार आहेत. राउंड १ मध्ये बांगलादेश, नामीबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि श्रीलंका देश आहेत. तर आफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, भारत आणि वेस्टइंडिज हे संघ सुपर १२ मध्ये आहेत.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #धक्कादायक #भारतीय #अंपायर #क्रिकेटमॅच #बॉल #निधन, SShocking #Indian #umpire #dies #hitting #ball #cricket #match
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनी ओव्होर फ्लो ! सोळा दरवाजे उचलून २० हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
Next Article पलटी झालेल्या ट्रकखाली सापडून चालकाचा मृत्यू, मेडीकलमधून साडेपाच लाख गायब

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?