Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत मूसळधार पाऊस; पुन्हा पुराचा धोका, पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

सांगलीत मूसळधार पाऊस; पुन्हा पुराचा धोका, पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2020/08/05 at 5:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर/सांगली : मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे या भागात महापूर आल्याने अतोनात नुकसान झालं होतं. तशीच काहीशी परिस्थिती यंदाही होताना दिसत आहे. दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा आज रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरात पंचगंगा नदी ही पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 16 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सध्या पंचगंगा ही 31 फुटांवरून वाहत आहे. परिणामी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे.

कोल्हापूर शहरामध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी या ठिकाणी अवघ्या दोन तासात पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी गेल्या वर्षीच्या पुराची आठवण झालीय. तर कोल्हापुरात जोतिबा-केर्ली हा मार्ग गेल्या वर्षी ज्या ठिकाणी खचला होता त्याच ठिकाणी पुन्हा खचला आहे. हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पंचगंगेची सध्याची पाणी पातळी 29 फूट 7 इंच इतकी आहे.

सलग दुसऱ्या दिवशी सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शिराळा तालुक्यात आणि चांदोली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने वारणा नदीवरील तीन लहान बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर वारणा नदीवरील काखे मांगले पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे भात पिकाला जोमदार असा पाऊस मिळाला आहे. यामुळे शेतकरी वर्ग उत्साहात आहे. पण सततच्या पावसाने वारणा आणि कृष्णा नदी पात्रामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #पंचगंगा #महापूर #सांगली #कोल्हापूर #चांदोली #वारणा #सतर्कतेचा #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे; केंद्राने विनंती स्वीकारली
Next Article सोलापूर शहरात आज दोन मृत्यू तर 49 रुग्णांची वाढ; 75 जणांची कोरोनावर मात

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?