सोलापूर : लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या – निषेधार्थ संयुक्त आघाडी घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे याला सोलापूरात आज समिश्र प्रतिसाद मिळाला. नवीपेठ, चाटीगल्ली येथील प्रमुख बाजारपेठा वगळता शहराच्या अन्य भागातील व्यवसाय सुरुळीत सुरु होते. मार्केट यार्डात भाज्या आणि फळांचे लिलाव झाले. रिक्षा वाहतूक सुरु आहे, एस. टी. वाहतूकीवर संमिश्र परिणाम आहे.
दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार हे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले. बाजार समितीत शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सोलापूरात युवा सेनेच्यावतीनं संगम येथे टायर जाळून महाराष्ट्र बंदची सुरुवात झाली आहे. माळशिरस तालुक्याच्या संगम येथे युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे.
माळशिरस तालुक्याच्या संगम येथे युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली. हा निषेध सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या संगम या ठिकाणी करण्यात आला.
या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली. यावेळी “केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री यांचा निषेध करत राजीनामा द्यावा ,भारतीय शेतकरी जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन सुरु आहे.
सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठेतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, यांचे स्थानिक नेते एकत्रीतपणे बंदचं आवाहन करत फिरत होते. पोलीसांनी बहुतेकांना हटकले. इकडे माकपानं स्वतंत्रपणे बंदला पाठिंबा देवून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. आज सकाळी आघाडीतील तिनही पक्षाच्या कार्यकर्ते प्रथम मॅकेनिकी चौकात जमले यानंतर काहीजण मार्केट यार्ड, तर काही जण चाटीगल्ली, टिळक चौक आणि नवीपेठ या दिशेनं बंदचं आवाहन करण्यासाठी रवाना झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सकाळपासूनच पोलीसांचा खडाबंदोबस्त होता. बंदचं आवाहन करत फिरणाऱ्या प्रमुख प्रणितींचा पत्रकारांनाच प्रति सवाल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीसांनी ठिकठिकाणी हटकलं तर काही ठिकाणी ताब्यातही घेतलं आहे.
यानंतर कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र जमले, मौनव्रत घेवून धरणे आंदोलन करण्यात आलं. तर काही कार्यकत्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. आ. प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव याचबरोबर तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. एरव्ही एकमेकाच्या विरोधात भाषणं ठोकणारी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसची स्थानिक नेते मंडळी आज मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रातील भाजपं सरकार विरोधात एकत्र आल्याचं चित्र दिसून आलं.
आ. प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मोदी सरकारचा अहंकारपणा, त्यांची सत्ता गाडून टाकेन असं म्हंटलयं आधी दलितांवर अत्याचार केले, आता शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत. लोक हे पाहत आहेत योग्यवेळी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असं त्या म्हणाल्या.
सोलापूरात आज प्रमुख दोन-तीन बाजार पेठा वगळता अन्यत्र व्यवहार सुरळीत आहेत. मार्केट यार्डात सकाळपासून गर्दी होती. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठी आहे. सरकारी कार्यालयात कामकाज नियमित सुरु आहे. शाळांकडे मात्र विद्यार्थी अपवादानच जाताना दिसले. बंद शांततेत सुरु असून संमिश्र प्रतिसाद आहे.