Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दसऱ्यानिमित्त सारसबागेतील महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दसऱ्यानिमित्त सारसबागेतील महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

Surajya Digital
Last updated: 2021/10/15 at 7:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. ही साडी तब्बल 16 किलो वजनाची आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. मंदिर प्रशासनाकडून ही साडी अर्पण करण्यात आली आहे.

दक्षिण भारतातील कारागिरांनी 10 वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे 11 वे वर्ष आहे. दसऱ्याच्या दिवशी हळदी-कुंकू आणि ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला, अशी माहिती मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केली.

नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये झाले. धार्मिक कार्यक्रमांसोबतच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, लस देणा-या सेवकांचा गौरव, कोविड काळात पालकत्व हरपलेल्या व देवदासिंच्या कन्यांचे पूजन, सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान, पोलीस खात्यातील महिलांचा गौरव असे सामाजिक कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित करण्यात आले होते.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #16kg #goldsari #Goddess #Mahalakshmi #Sarasbage #occasion #Dussehra, #दसऱ्यानिमित्त #सारसबाग #महालक्ष्मीदेवी #16किलो #सोन्याची #साडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘शरद पवारांना पंतप्रधान पद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना’
Next Article ‘रोज आमचा एक नेता उठतो आणि सरकार पडणार सांगतो’

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?