नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये तेथील सरकारकडून अटक करण्यात आली. आता त्याला भारतात प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो सीबीआय व्यतिरिक्त तो एफबीआयच्या रडारवर होता. सुरेश पुजारी यापूर्वी डॉन रवी पुजारीसोबत काम करत होता. सुरेश पुजारी हा वसुलीसाठी तो नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांना नियमित कॉल करत असे. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांच्यावर तो गोळ्या झाडत असे.
सुरेश पुजारीच्या अटकेमुळे अडरवर्ल्डमधील जवळपास सर्वच मोठे डॉन अटकेत आले आहेत. छोटा राजन, रवी पुजारी, एजाज लकडावाला यांना देखील भारताच्या हवाली करण्यात आलं आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या भाच्याच्या अटकेमुळे डी गँगच्या कारवाया देखील काहीशा कमी झाल्याचं दिसत आहे. दाऊद गँगकडून खंडणीसाठी येणारे कॉलही गेल्या काही काळापासून बंद झाले असल्याचे वृत्त आहे.
सुरेश पुजारी मूळचा उल्हासनगरचा आहे. २००७ साली तो भारतातून पळून गेला. सुरेश पुजारी वगळता ते सुरेश पुरी आणि सतीश पै या नावांनी वेगवेगळ्या देशांमध्ये राहत होते. त्याला या विविध नावांनी बनावट पासपोर्टही मिळाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुरेश पुजारी एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करत होता. २०१२ च्या सुमारास रवी पुजारीसोबत त्याचे वाद झाल्यानंतर त्यानं पुजारी गँग सोडून आपली नवी गँग बनवली होती. नवी मुंबई, ठाणे, मुंबई या भागातल्या डान्स बार चालकांना खंडणीसाठी सुरेश पुजारी गँगचे फोन येत होते. तसेच, खंडणी न देणाऱ्यांची हत्या झाल्याचेही माहिती आहे. २०१८ मध्ये सुरेश पुजारीच्या शूटर्सनी कल्याण-भिवंडी महामार्गावरच्या के. एन. पार्क हॉटेलमध्ये गोळ्या झाडल्या होत्या. यात रिसेप्शनवरील एक कर्मचारी जखमी झाला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते. २००७ मध्ये सुरेश पुजारीनं भारताबाहेर पलायन केलं होतं. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता फिलिपिन्समधून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.
सुरेश पुजारी मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय बरोबरच सीबीआयही रडारवर होता. एफबीआयनंच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा सुरेश पुजारीच्या शोधात होते. गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावलं उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरातून अटक केली. एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.